Solapur: शेतकऱ्याच्या पोराला उमेदवारी जाहीर होताच लगेच दुसरा एबी फॉर्म येतोच कसा असा? खा.विशाल पाटीलांचा सवाल

Vishal Patil Latest News: एबी फॉर्म येतोच कसा असा प्रश्न उपस्थित करत भालकेसाठी अडकाठी आणण्याचे काम केल्याचा आरोप करत या मतदारसंघातील खरी लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यात आहे.
Solapur: शेतकऱ्याच्या पोराला उमेदवारी जाहीर होताच लगेच दुसरा एबी फॉर्म येतोच कसा असा? खा.विशाल पाटीलांचा सवाल
Updated on

Latest Solapur News: सांगली लोकसभा निवडणुकीसाठी प्रभावी उमेदवार मी असताना मित्रपक्षाने माझ्यावर अडकाटी आणली त्याच पद्धतीने पंढरपूर मतदार संघात भगीरथ भालके हे प्रभावी आणि निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार असताना मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे नाव न घेता अडकाठी आणण्यासाठी डावपेच आखल्याने या मतदारसंघात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होणार असल्याचे संकेत खा. विशाल पाटील यांनी दिले.

काँग्रेस महाविकास काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मरवडे येथील सभेत ते बोलत होते. यावेळी भगीरथ भालके, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे, काँग्रेस कार्याध्यक्ष अॅड नंदकुमार पवार, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे,माजी सभापती राजाराम जगताप, पांडुरंग चौगुले, बसवराज पाटील,मारूती वाकडे,अॅड राहूल घुले, मनोज माळी, रविकिरण कोळेकर,अशोक पवार, माणिक पवार, अनिल पाटील,श्रीकांत पवार ,नितीन पाटील, गुलाब थोरबोले,दौलत माने,धनजंय पाटील,जगन्नाथ कर्वे,अशोक माने, आदी यावेळी उपस्थित होते .

Solapur: शेतकऱ्याच्या पोराला उमेदवारी जाहीर होताच लगेच दुसरा एबी फॉर्म येतोच कसा असा? खा.विशाल पाटीलांचा सवाल
सोलापूरमधून प्रणिती शिंदे तर माढ्यातून मोहितेंचा विजय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.