NCP Crisis Live : दीपक साळुंखे पाटील अजित पवारांच्या तर बहीण जयमालाताई गायकवाड शरद पवारांच्या गटामध्ये

Maharashtra Political News : राज्यात राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर्गत वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने काकापासून पुतण्यांनी फारकत घेऊन भाजप शिवसेनेबरोबर सत्तेमथ्ये सामील
sangola ncp sharad pawar jaymalatai gaikwad deepak salunkhe ajit pawar maharashtra politics
sangola ncp sharad pawar jaymalatai gaikwad deepak salunkhe ajit pawar maharashtra politicsSakal
Updated on

Sangola NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील हे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्यासपीठावर तर त्यांची सख्खी बहीण महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष व सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड या शरद पवार यांच्या गटात सामील झालेल्या दिसून आल्या.

sangola ncp sharad pawar jaymalatai gaikwad deepak salunkhe ajit pawar maharashtra politics
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादीत 'बॉस' कोण? कोणत्या गटात कोणता नेता, आज होणार फैसला

राज्यात राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर्गत वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने काकापासून पुतण्यांनी फारकत घेऊन भाजप शिवसेनेबरोबर सत्तेमथ्ये सामील झाले आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून त्यांचे पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षांतर्गत बंडाचे दंड थोपटून आपली वेगळी भूमिका घेतली.

विरोधी पक्षनेते पदावरून ते थेट राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. परंतु घरामध्येच फूट पडल्याने राष्ट्रवादी अंतर्गत बंडाळी उफाळून आली. या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये वेगवेगळे गट राज्यभर निर्माण झाले आहेत.

sangola ncp sharad pawar jaymalatai gaikwad deepak salunkhe ajit pawar maharashtra politics
NCP latest Update : पूर्व मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अस्तित्व अधिक धूसर; नेते, कार्यकर्ते ‘नॉट रिचेबल’

आज बुधवार (ता. 5) रोजी राष्ट्रवादी मधीलच काका व पुतण्यांच्या दोन वेगवेगळ्या बैठका सुरू झाल्या. अनेक आमदार, माजी आमदार, खासदार, पक्षातील पदाधिकारी हे काहीजण काकांकडे तर काहीजण पुतण्यांकडे गेलेले दिसून आले.

सोलापूर जिल्ह्याचेही माजी आमदार व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले तसेच सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आठ वर्षे काम पाहिलेले दीपक आबा साळुंखे पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्यासपीठावर बसलेले दिसून आले तर त्यांची सख्खी बहीण राष्ट्रवादी महिला प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष व सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या जयमालाताई गायकवाड या मात्र शरद पवार यांच्या गटामध्ये सामील झाल्या आहेत.

sangola ncp sharad pawar jaymalatai gaikwad deepak salunkhe ajit pawar maharashtra politics
Satara Politics : शरद पवार की अजित पवार? NCP पदाधिकाऱ्यांत द्विधावस्था; मुंबईत आज दोन्ही गटांची स्वतंत्र बैठक

राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांच्या घरामध्ये वेगळ्या भूमिका घेतलेल्या दिसून आल्या तशीच भूमिका माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या घरांमध्येही घेतलेली दिसून आली.

राज्याप्रमाणे सांगोल्यातही अगोदरच या पॅटर्नची सुरुवात -या अगोदर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षांमध्ये राज्यात आघाडी झाली होती.

sangola ncp sharad pawar jaymalatai gaikwad deepak salunkhe ajit pawar maharashtra politics
Sangola Crime : डोक्यात दगड घालून सेंट्रींग कामगाराचा खून; अल्पवयीन मुलासह तिघांना घेतले ताब्यात

परंतु शिवसेनेचे उमेदवार असलेले आमदार शहाजी पाटील यांच्यासाठी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी वेगळी भूमिका घेऊन शेकापच्या उमेदवाराच्या विरोधात आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विजयासाठी जिवाचे रान केले होते.

त्यांच्या पाठिंबामुळेच अल्पमतात का होईना शहाजी बापू पाटील आमदार झाले. त्यामुळे सध्या सेना-भाजप व राष्ट्रवादीची युती झाली आहे तशी यूती या अगोदर सांगोला विधानसभेच्या वेळी व त्यानंतर झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये दीपक आबा साळुंखे पाटील व आमदार शहाजी बापू पाटील यांच्या माध्यमातून सांगोल्यातून सुरुवात झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.