बापानेच केला मुलाचा खून ! दगड बांधून तलावात टाकला होता मृतदेह

बापानेच सुपारी देऊन केला मुलाचा खून ! दगड बांधून तलावात टाकला होता मृतदेह
crime
crimeMedia Gallery
Updated on
Summary

बुद्धेहाळ (ता. सांगोला) तलावात 15 जुलै रोजी दगड बांधून टाकलेला मृतदेह आढळला होता.

सांगोला (सोलापूर) : बुद्धेहाळ (ता. सांगोला) तलावात 15 जुलै रोजी दगड बांधून टाकलेला मृतदेह आढळला होता. या घटनेचा उलगडा झाला असून, बापानेच स्वतःच्या मुलास मारण्याची सुपारी देऊन त्याचा खून (Crime) केला होता. या प्रकरणी पोलिसांनी बापासह इतर चार जणांना अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना एक ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Sangola police arrested four people, including the father, who caused the son's death-ssd73)

crime
ऑनलाइन शिक्षणामुळे वाढले आजार! "ई-क्‍लिनिक'द्वारे समस्या सोडवणे शक्‍य

याबाबत अधिक माहिती अशी की, 15 जुलै रोजी बुद्धेहाळ (ता. सांगोला) (Sangola Taluka) येथील तलावात एका अनोळखी इसमाचा डोके नसलेला मृतदेह आढळून आला होता. पोलिस पाटील सोपान गडदे यांनी याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपासादरम्यान सांगली पोलिसांनी (Sangli Police) विलास बाबू सरगर (रा. कवलापूर, ता. मिरज, जि.सांगली) या संशयित व्यक्तीस ताब्यात घेऊन सांगोला पोलिसांच्या (Sangola Police) ताब्यात दिले. त्यानंतर सांगोला पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सुपारी देऊन मुलाचा खून केला असल्याचे कबूल केले. मुलगा सतत कुटुंबातील सदस्यांना त्रास देत असल्याच्या कारणाने वैतागून बापाने मुलाच्या खुनाची सुपारी दिली होती. मृत विजय विलास सरगर (वय 21, रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली) याचा खून केल्याप्रकरणी वडील विलास बाबू सरगर, उत्तम महादेव मदने (रा. सध्या रा. डेरवली, राम मंदिराजवळ, माऊली सदन, उरण, पनवेल, मूळ रा. लक्ष्मीनगर, सांगली), प्रकाश गोरख कोळेकर, संतोष विठ्ठल पांढरे, वैभव तानाजी आलदर (सर्व रा. कराडवाडी, कोळा, ता. सांगोला) यांना पोलिसांनी अटक केली.

crime
आबासाहेबांच्या प्रकृतीतील सुधारणा हा एक दैवी चमत्कार !

या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Superintendent of Police Tejaswi Satpute), अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे (Upper Superintendent of Police Atul Zende), उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील (Sub-Divisional Police Officer Rajshri Patil), पोलिस निरीक्षक सुहास जगताप (Police Inspector Suhas Jagtap) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले हे करत आहेत. त्यांना फौजदार कल्याण ढवणे, पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू चौगुले, पोलिस नाईक, विजय थिटे, पोलिस नाईक दत्तात्रय वजाळे, पोलिस नाईक आप्पा पवार, पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी, पोलिस कॉन्स्टेबल गणेश कोळेकर, सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल अनवत आतार, चालक पोलिस कॉन्स्टेबल सुनील लोंढे, चालक पोलिस हेडकॉन्स्टेबल मनोहर भुजबळ यांनी गुन्ह्याच्या तपास कामात मदत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()