बोंबील, कांद्यामध्ये लपवून पुण्याला चालला कर्नाटकचा गुटखा ! सांगोला पोलिसांनी पकडलाच

कर्नाटकहून पुणे येथे गुटखा घेऊन जात असताना पोलिसांनी केली कारवाई
Gutkha
GutkhaEsakal
Updated on

सांगोला (सोलापूर) : कर्नाटकमधून (Karnataka) पुण्याला (Pune) भाजीमध्ये लपवून चाललेला 41 पोती अवैध गुटखा (Gutkha) सांगोला पोलिसांनी (Sangola Police) पकडला. पोलिसांनी ही कारवाई येथील वंदे मातरम चौकात केली. यामध्ये 14 लाख 64 हजार 420 रुपयांच्या गुटख्यासह एकूण 19 लाख 64 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मोठी कारवाई केली आहे. (Sangola Police took action while taking gutkha from Karnataka to Pune)

बुधवारी (ता. 5) दुपारी तीनच्या दरम्यान पोलिस नाईक महेश पवार व पोलिस कॉन्स्टेबल सचिन देशमुख यांना वंदे मातरम चौकात एमएच 14/जीडी 5444 हा टेम्पो संशयास्पद स्थितीत मिळून आला. त्याचा चालक हसन सिराज शेख (रा. कोंढवा बु., पुणे) तसेच अल्लाबक्ष अब्दुलगनी बागवान (रा. जळकोट, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी टेम्पोमध्ये विमल पानमसाला, तंबाखूजन्य जर्दा हे बोंबील, भुसा, कांदे आदी तरकारी मालात 41 गुटख्याची पोती लपवली होती. या वेळी अन्न व औषध प्रशासन अधिकारी मंगेश लवटे यांनी चौकशी केली. 14 लाख 64 हजार 420 रुपयांचा गुटखा व पाच लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण 19 लाख 64 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Gutkha
रेमडेसिव्हीरचा काळाबाजार ! तिघे पोलिसांच्या जाळ्यात; सलग दुसऱ्या दिवशी कारवाई

गुटख्याची वाहतूक करण्यासाठी टेम्पोमध्ये कोणाला समजू नये, गुटखा पकडला जाऊ नये यासाठी चालकाने टेम्पोच्या वरील बाजूस घाणेरडा वास येत असलेले बोंबील, भुसा, कांदे, टोमॅटो असा तरकारी माल असल्याचा देखावा केला होता. परंतु, पोलिसांच्या नजरेतून हा अवैध गुटखा सुटू शकला नाही. ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील व पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.