Solapur : सांगोला आठवडा बाजारात चोरट्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात ; सव्वातीन लाखाचा मुद्देमाल केला जप्त

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याजवळ एकूण 13 महागडे मोबाईल्स व गुन्ह्यात चोरी करता वापरण्यात आलेली मोटरसायकल असे एकूण सुमारे 3 लाख 24 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Solapur
Solapursakal
Updated on

Solapur - सांगोला येथील आठवडा बाजारातून तीन चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी केलेले 13 महागड्या मोबाईलसह एकूण 3 लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.

तालुक्यात आठवडा बाजारातून मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने सांगोल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी आठवडा बाजारावर साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवली होती. दिनांक 18 जून रोजी सांगोला येथील आठवडा बाजारामध्ये गस्त करत असताना एक महिला व दोन व्यक्ती संशयरीत्या आढळल्याने या तिघांना ताब्यात घेतले.

Solapur
Mumbai News : कुठल्याही चौकशीला तयार! माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची भूमिका

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याजवळ एकूण 13 महागडे मोबाईल्स व गुन्ह्यात चोरी करता वापरण्यात आलेली मोटरसायकल असे एकूण सुमारे 3 लाख 24 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बबन धुळा तुपे (वय - 60), नितीन अर्जुन तुपे (वय - 30) व शहिदा महादेव तुपे (वय - 38, सर्व रा. पानवण, ता. माण, जि. सातारा) अशी आहेत. त्यांच्याबाबत अधिक चौकशी केली असता ते रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचेही माहिती अनंत कुलकर्णी यांनी दिली.

Solapur
Mumbai News : कुठल्याही चौकशीला तयार! माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची भूमिका

हा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता वजाळे, विकास क्षीरसागर, पोलीस नाईक बाबासाहेब पाटील, केदारनाथ भरमशेट्टी, लक्ष्मण वाघमोडे व युसुफ पठाण यांनी केला आहे.

सांगोला तालुक्यातील आठवडा बाजारातून मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांना साध्या वेशातील गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. चोरीसह इतर घटना घडू नये म्हणून सध्या पोलिसांची गस्त यापुढे वाढवण्यात येईल -

अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, सांगोला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()