Lost And Found StartUp
Lost And Found StartUpsakal

Lost And Found StartUp : सांगोल्यातील स्टार्टअपला पोलंडची मदत; जगातील सर्वोत्कृष्ट ४० स्टार्टअपमध्ये समावेश

सांगोला येथील सुजित बाबर यांच्या स्टार्टअपला प्रतिसाद
Published on

सोलापूर : सांगोला येथील सुजित बाबर यांनी लॉस्ट ॲंड फाऊंड या संकल्पनेवर आधारित स्टार्टअपला पोलंड सरकारने मदत देऊ केली आहे. जगातील सर्वोत्कृष्ट ४० स्टार्टअपमध्ये त्यांच्या स्टार्टअपचा समावेश पोलंड सरकारने केला आहे.

सुजीत बाबर हे मूळचे सांगोल्याचे रहिवासी आहेत. संगणक शास्त्रात पदवी घेतल्यानंतर त्यांनी सायबर क्राईम विषयाचे शिक्षण घेतले. नंतर काही वर्षे त्यांनी आयटीमध्ये नोकरी केली. आयटी सेक्टरमध्ये ते सॉफ्टवेअर व हार्डवेअर या दोन्ही क्षेत्रात सोल्युशन बेस्ड काम करत असताना त्याचा लाभ त्यांना याच्या विकसनासाठी मोठ्या प्रमाणात झाला.

लॉकडाऊनच्या काळात रेल्वे पोलिसांनी प्रवाशांनी सोडून दिलेल्या वस्तू मूळ मालकांना परत मिळवून दिल्या. त्याची किमंत ५० कोटी रुपये एवढी होती. या घटनेचा अभ्यास सुजीत बाबर यांनी सुरु केल्यावर मूळ मालकाला त्याच्या हरवलेल्या वस्तू परत न सापडणे ही समस्या त्यांच्यासमोर प्रकर्षाने आली.

Lost And Found StartUp
Sangola News : आबासाहेब, तुमच्या पक्षात पण..!" गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेकापमधील दुफळीची होतेय सर्वत्र चर्चा

या प्रकारे हरवणाऱ्या वस्तू पुन्हा मूळ मालकाला कशा मिळवून दिल्या जाऊ शकतात यावर त्यांनी संशोधन सुरु केले. या प्रकारे आपण एखादी वस्तू सार्वजनिक ठिकाणाहून हरवल्यास ती परत मूळ मालकाला परत देण्याच्या दृष्टीने लागणारी संपुर्ण संगणक प्रणाली त्यांनी उभारण्याचे काम सुरु केले. त्यांचे हे संशोधन अनेक महिने चालले.

त्यांच्या या संशोधन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्यांचे स्टार्टअप सादरीकरण देशातील अनेक नामवंत स्पर्धामध्ये केले. देशभरातून या स्टार्टअपला प्रचंड प्रतिसाद मिळाला. देशातील अनेक संस्थांनी त्यांच्या स्टार्टअपला पुरस्कारांनी गौरवान्वित केले.

Lost And Found StartUp
Startup : ‘पिनाक लॅंड बँक’ स्टार्टअपद्वारे करा जमिनीच्या जोखमींचे मूल्यमापन!

त्यासोबत पुणे मेट्रो ने त्यांच्या स्टार्टअपची दखल घेतली. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीने त्यांचे स्टार्टअप वापरण्याचा निर्णय घेतला. पोलंड सरकारने त्यांच्या स्टार्टअपला प्रोत्साहन व फंडींग देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या उद्यमने त्यांना पाठबळ दिले आहे.

स्टार्टअपमधून विकसित झालेली मूल्ये

  • आयटीबेसवर सामाजिक समस्यांची सोडवणुकीचा उपाय

  • नोकरीतील कामाचा अनुभव हा वर्कींग बेस

  • छोट्याशा घटनेवरून स्टार्टअपची संकल्पना निर्मिती

  • सार्वजनीक जीवनातील सुरक्षिततेला प्राधान्य

Lost And Found StartUp
Startup in India: इंजिनियर्सची कमाल! एक छोटंसं पुडकं फ्रीजशिवाय फळं-भाजीपाला ठेवेल ताजं

ठळक बाबी...

  • हरवलेल्या वस्तु मुळ मालकापर्यंत देण्याची प्रणाली विकसित

  • पुणे मेट्रोकडून स्टार्टअपची दखल

  • पिंपरी-चिंचवड महानगपालिकेकडून काम सुरु

  • पोलंड सरकारची निधी देण्याची तयारी

भविष्यात या स्टार्टअपचा विस्तार इतर देशांमध्ये देखील करण्याच्या दृष्टीन कामास सुरवात केली आहे. पोलंड नंतर इतर देशात या स्टार्टअपचा स्वीकार व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- सुजित बाबर, संस्थापक, लॉस्ट ॲण्ड फाउंड स्टार्टअप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.