Sangola News : सांगोल्यातील 19 गावांना एक टीएमसी पाणी मंजूर - आमदार शहाजी पाटील

टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अतिरिक्त असणाऱ्या ८ टीएमसी पाणी वाटपाच्या आराखड्याला हिवाळी अधिवेशन नागपूर येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली आहे.
Mla Shahajibapu Patil
Mla Shahajibapu Patilsakal
Updated on

सांगोला - टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अतिरिक्त असणाऱ्या ८ टीएमसी पाणी वाटपाच्या आराखड्याला हिवाळी अधिवेशन नागपूर येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली आहे. त्यानुसार ५ जानेवारी रोजी याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाला आहे.

यामध्ये सांगोला तालुक्यातील १९ वंचित गावांना एक टीएमसी व माण नदीवरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे वर्षातून तीन वेळा भरून घेण्यासाठी ०.६०० एमसीएफटी असे एकूण १.६०० टीएमसी पाणी नव्याने मंजूर झाल्याची माहिती आमदार शहाजी पाटील यांनी दिली.

सांगेला तालुक्यातील १९ वंचित गावांसोबत माण नदीवरील २० गावांना याचा मोठा लाभ होणार असून यापुढे माणनदी बारमाही भरलेली असणार असेही आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. एक टीएमसी पाण्यातून अजनाळे, लिगाडेवाडी, चिणके, खवासपूर, जुनी व नवीन लोटेवाडी, मंगेवाडी, सोनलवाडी, वझरे या ७ गावांना एकूण ४ हजार २३१ हेक्टर क्षेत्राला व बुध्देहाळ तलावासोबत सोमेवाडी, पाचेगाव, हातीद, चोपडी, बंडगरवाडी, बुद्धेहाळ या सहा गावांना बुद्धेहाळ तलाव भरणे सहित १ हजार २०० हेक्टर क्षेत्राला असे कामत गुरुत्व नलिकेतून एकूण ५ हजार ४३१ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे.

डोंगरगाव, हणुमंतगाव, मानेगाव, काळूबाळूवाडी, गुणापाचीवाडी व हटकर मंगेवाडी या सहा गावांना ९०३ हेक्टर क्षेत्राला बेवनूर गुरुत्व नलिकेतून पाणी मिळणार आहे. एकूणच १९ गावांमधील ६ हजार ३३४ हेक्टर क्षेत्राला या एक टीएमसी पाण्याचा लाभ मिळणार आहे.

माण नदीवरील सुमारे वीस गावांना नव्याने मंजूर झालेल्या ०.६०० एमसीएफटी पाण्याचा मोठा लाभ होणार असून वर्षातून तीन वेळा माण नदीवरील सर्व बंधारे अधिकृतरित्या भरण्यात येणार असल्याने यापुढील काळामध्ये माण नदी बारमाही भरलेली असणार आहे. नदीकाठावरील सर्व शेतकऱ्यांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण झाले आहे.

या योजनेला मंजुरी मिळविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार यांच्यासह माढ्याचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांचे खूप मोठे सहकार्य लाभल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले.

माझ्या दृष्टीने आज अत्यंत समाधानाचा दिवस असून गेली चार वर्षे सातत्याने पाठपुरावा करून सांगोला तालुक्याचा सर्वात मोठा पाण्याचा प्रश्न मी सोडवू शकलो याचा मला खूप आनंद आहे. उजनीच्या २ टीएमसी पाण्याचा विषय ही मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये असून लवकरच याला मान्यता मिळेल. तालुक्याचा वर्षानुवर्षांचा दुष्काळ कायमस्वरूपी संपेल.

- शहाजी पाटील, आमदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.