Mohal: धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी करण्यासाठी समाज आता रस्त्यावर उतरला आहे, मात्र या सरकारला जाग येत नाही. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर असताना आश्वासन दिल्याने सन 2014 साली समाज भाजपाच्या मागे एक संघ उभा राहिला.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. त्यांनी त्यावेळी दिलेले आश्वासन पाळावे व धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा समाज सरकारला खाली खेचल्या शिवाय राहणार नाही असे प्रतिपादन मोहोळ येथील धनगर समाजाचे नेते संजय क्षीरसागर यांनी केले.