केंद्र शासनाच्या धोरणानुसार सावळेश्वर व वरवड २ टोल नाके

सावळेश्वर टोलनाका बंद झाला तर सुमारे पाचशे कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे कर्मचारी पाण्यात देव ठेवून बसले
Savleshwar Varvad 2 toll gates Solapur-Pune National Highway Central Government policy Nitin Gadkari
Savleshwar Varvad 2 toll gates Solapur-Pune National Highway Central Government policy Nitin Gadkarisakal
Updated on

मोहोळ : केंद्रीय अवजड वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या साठ किलोमीटर वर एक टोलनाका या धोरणानुसार सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर व वरवड असे दोन टोलनाके आहेत. या दोन्ही पैकी कोणता टोल नाका बंद होणार याची स्पष्टता नसल्याने अधिकारी व सर्व कर्मचारी संभ्रमात आहेत. सावळेश्वर टोलनाका बंद झाला तर सुमारे पाचशे कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे कर्मचारी पाण्यात देव ठेवून बसले आहेत.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सावळेश्वर व वरवड हे दोन टोल नाके आहेत. या दोन टोलनाक्यातील अंतर सुमारे अंतर 51 किलोमीटर आहे. सावळेश्वर टोल नाक्यावरून दररोज आठशे ते साडे आठशे चार चाकी वाहने ये जा करतात .त्यामुळे कोणता टोल नाका बंद होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सावळेश्वर टोलनाका सन 2013 मध्ये सुरू झाला असून हा टोल नाका आय एल एफ एस या कंपनीचा आहे. या टोल नाक्यावर वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून पवन सिंग हे काम पाहत आहेत.

त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले कंपनीकडून ज्या सोयी सुविधा आम्हाला मिळायला पाहिजेत त्या सर्व नियमित मिळतात, तसेच पगारही वेळेवर केला जातो. सावळेश्वर टोलनाका बंद झाला तर कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागेल. किंवा अन्य पर्याय शोधावा लागेल. संपूर्ण भारतातच अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. सावळेश्वर टोल नाक्यावर दोन रुग्णवाहिका, दोन गस्ती वाहने व दोन क्रेन आहेत. मोहोळ वरून विजापूरला जाता येत असल्याने वाहने मंद्रूप मार्गे जातात, त्यामुळे त्यांचा टोल वाचतो त्यामुळे त्याचा फटका सावळेश्वर टोल नाक्याला बसतो.

साठ किलोमीटर अंतरावर एकच टोल नाका हे शासनाचे धोरण निश्चित झाले आहे, मात्र आमच्याकडे अद्याप कोणतीही स्पष्टता कंपनीकडून आली नाही.

- पवनसिंग वरिष्ठ व्यवस्थापक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()