पाचवी व आठवीची शिष्यवृत्तीची परीक्षा फेब्रुवारीत घेण्याचे नियोजित आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना बरे होईपर्यंत अध्यापनात सवलत दिली. मात्र, त्यांना त्यांच्या शिल्लक रजेतूनच सुट्टी मिळणार आहे. सुट्ट्या शिल्लक नसल्यास बिनपगारी रजा घ्यावी लागणार आहे.
सोलापूर : पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा (Scholarship exam) फेब्रुवारीत नियोजित आहे. कोरोनाचा (Corona)संसर्ग वाढल्याने 15 फेब्रुवारीपर्यंत कडक निर्बंध लागू असून शाळा (School), महाविद्यालयेदेखील (College)तोवर बंद आहेत. त्यामुळे ही परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या की चौथ्या रविवारी घ्यायची, याचा निर्णय पुढील निर्बंधांवर अवलंबून असणार आहे.
मागच्या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा (Scholarship exam)निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात अनेक तालुक्यांतील गुणवत्ता घसरल्याची वस्तूस्थिती समोर आली. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी संबंधित तालुक्यांमधील मुख्याध्यापकांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. कोरोनामुळे (Corona) मागील पावणेदोन वर्षांपासून शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण (Online teaching) द्यावे लागले. अनेक मुलांकडे ऍन्ड्राइड (Android) साधने उपलब्ध नसल्याने त्यांना शिक्षण घेता आले नाही. त्यांच्यासाठी पारावरील शाळा, गृहभेटी असे उपक्रम राबविण्यात आले. तरीही, शिष्यवृत्तीचा टक्का घसरला हे विशेष. आगामी शिष्यवृत्ती परीक्षेत आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यश संपादित करावे, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सक्त सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. शाळेच्या वेळेतच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापन करावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून जवळपास दहा ते बारा हजार विद्यार्थी बसतील, असा विश्वास प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी व्यक्त केला.
पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा फेब्रुवारीत घेण्याचे नियोजन आहे. परंतु, तिसऱ्या की चौथ्या आठवड्यातील रविवारी परीक्षा होईल हे निश्चित नाही. शिष्यवृत्तीतील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यादृष्टीने शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे.
- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांनी घ्यावी रजा
शैक्षणिक काम करताना अथवा घराबाहेर असताना एखादा शिक्षक कोरोनाबाधित झाल्यास, तो बरा होईपर्यंत सवलत दिली जात आहे. मात्र, त्यांना विशिष्ट प्रकारची रजा मिळणार नाही. त्यांना त्यांच्या शिल्लक रजा खर्ची टाकून उपचार घेता येतील, रजेशिवाय दुसरी सवलत कोणतीही नाही. अन्यथा, त्यांना बिनपगारी रजा घेऊन उपचार घ्यावे लागणार आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देणे बंधनकारक आहे. तसेच शाळेत त्यांची 100 टक्के उपस्थिती असावी, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.