शिक्षणाधिकाऱ्यांचे शिक्षकांना आदेश! 'या' कामांची ठेवावी लागणार नोंद

शाळा बंद असतानाही शिक्षकांना दररोजच्या कामांची नोंद ठेवावी लागणार असून त्याची कधीही पडताळणी होऊ शकते. नोंद नसलेल्यांवर प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याची चर्चा आहे.
Teachers
TeachersSakal
Updated on

सोलापूर : कोरोना व ओमिक्रॉनचा (Corona And Omicron) विळखा वाढू लागल्याने पहिली ते आठवीचे वर्ग 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवले आहेत. शाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद राहू नये म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी आता शिक्षकांनाच त्यासंबंधीचे धडे दिले आहेत. शाळा बंद केल्याने पालक आक्रमक झाल्यानंतर त्यांनी स्वतंत्र आदेश काढले, हे विशेष. (Corona Period Teachers Work)

शाळा बंद असतानाही सर्व शिक्षकांनी शाळेच्या वेळेत शाळेतच उपस्थित राहायला हवे, असे शिक्षणाधिकारी लोहार यांनी आदेशातून स्पष्ट केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत न बोलावता ऑनलाइन अध्यापन करावे, वर्ग तथा विषय शिक्षकांनी विविध ऍन्ड्राईड ऍपच्या माध्यमातून पाठनिहाय व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावेत, पूर्वीचे पाठनिहाय व्हिडिओ विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पाठवावेत, असेही सांगण्यात आले आहे.

Teachers
महापालिकेतील २३ गावातील बांधकाम परवानगीचे अधिकार PMRDA कडे

शासनाने सुरु केलेल्या दीक्षा ऍप व विविध उपकरणांच्या माध्यमातून अध्यापन करावे, पहिली ते आठवीचे विषयनिहाय घटकांचे ऑनलाइन अध्यापन करणे सर्व शिक्षकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्‍यांमधील तंत्रस्नेही शिक्षकांचे केंद्रनिहाय गट तयार करून प्रभावीपणे ऑनलाइन शिक्षणाची अंमलबजावणी करावी, विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, अशाही सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना केल्या आहेत. विशेष म्हणजे दररोजच्या कामांची नोंद शिक्षिकांना ठेवावी लागणार असून त्याची कधीही पडताळणी होऊ शकते. नोंद नसलेल्यांवर प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याची चर्चा आहे.

शाळा बंद, पण पारावर शिकवायला परवानगी

ग्रामीण भागातील अनेक मुलांकडे ऍन्ड्राईड मोबाइल नसल्याने त्यांची गुणवत्ता ढासळली असून अनेकजण शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेले आहेत. त्या विद्यार्थ्यांना पारावर शाळा सुरु करावी. गृहभेटीतून आणि गावातील सुशिक्षित तरुणांच्या माध्यमातून त्यांना शिक्षण द्यावे, अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, पारावरील शाळा कोणत्या गावांमध्ये सुरु करता येईल, कोरोनामुक्‍त अथवा रुग्ण कमी असलेल्या गावांमध्ये की कुठे, त्यासंबंधीचा कोणताही निकष आदेशात नमूद नसल्याने शिक्षकही संभ्रमात आहेत. दुसरीकडे शाळा सुरु असल्यावरच कोरोना वाढतो का, असा प्रश्‍न या निमित्ताने पालक विचारु लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.