खासगी शिक्षक भरतीवेळी आता 'शिक्षण'चा प्रतिनिधी उपस्थित असणार; माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे संस्थांना आदेश

Secondary Education Officer Sachin Jagtap : पवित्र पोर्टलवरून भरती होण्यापूर्वी खासगी शैक्षणिक संस्थामधील शिक्षक भरती त्यांच्या मनाप्रमाणे होत होती.
Secondary Education Officer Sachin Jagtap
Secondary Education Officer Sachin Jagtapesakal
Updated on
Summary

जिल्ह्यातील खासगी अनुदानित संस्थांमध्ये २४६ शिक्षकांची भरती होणार आहे. पवित्र पोर्टलवरून एका पदासाठी दहा उमेदवार देण्यात आले आहेत.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांसह (Educational Institution) राज्यभरात सहा हजार शिक्षकांची भरती (Teacher Recruitment) होत आहे. त्यासाठी शिक्षण आयुक्तालयाने पवित्र पोर्टलवरून एका पदासाठी दहा उमेदवारांची यादी संबंधित संस्थांना पाठविली आहे. त्या दहा उमेदवारांच्या मुलाखती घेताना आता तेथे उपशिक्षणाधिकारी किंवा गटशिक्षणाधिकारी उपस्थित असतील, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप (Sachin Jagtap) यांनी स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.