Solapur News : पावणे दोनशे कोटीच्या कर थकबाकीसाठी ११५० जणांना जप्ती नोटीस

मिळकत थकबाकीदारांवर महापालिकेची कारवाई मोहीम सुरू
seizure notice to 1150 persons for tax arrears of 200 cr solapur municipal action
seizure notice to 1150 persons for tax arrears of 200 cr solapur municipal action Sakal
Updated on

सोलापूर : महापालिकेने गणेशोत्सवामुळे थांबविलेली मिळकत कर वसुली मोहीम सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात तीन लाख व त्यापेक्षा अधिक मिळकत कर थकबाकी असलेल्या साधारण पावणे दोनशे कोटीच्या थकबाकीपोटी १ हजार १५० मिळकतदारांना नोटीस काढण्यात आले आहेत. पेठनिहाय नोटीस वाटपाला सुरवात झाली आहे.

महापालिका प्रशासनाने पाच व सहा टक्के सूट घेऊन मिळकत कर भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. या कालावधीत १०२ रुपयांची वसुली झाली. यापूर्वी थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविली जात होती.

परंतु या योजनेमुळे प्रामाणिक कर भरणाऱ्यांवर अन्याय होत असल्याने आयुक्तांनी ही अभय योजना पूर्णतः बंद केली. त्यामुळे मुदतीनंतर सव्वा महिन्यात साधारण दहा कोटी रुपये असे एकूण १११ कोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले.

सोलापूर शहर आणि हद्दवाढ भागातील चालू व मागील थकबाकीचा आकडा हा ६३६ कोटी इतका आहे. दुबार आकारणीसह इतर तांत्रिक गोष्टी पाहता थकबाकीचा फुगीर आकडा साधारण १०० कोटीने कमी होऊन ५५० कोटी इतका आहे. यातील १११ कोटी रुपये वसुली करण्यात आली आहे. यंदाचा वर्षाचा वसुली उद्दिष्ट्य ३०२ कोटी इतकी आहे.

महापालिका प्रशासनाने मुदत संपल्यानंतर थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उचलणार होते. मात्र गणेशोत्सवामुळे वसुली मोहीम उशिराने हाती घेण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने गतवर्षीच्या कारवाईप्रसंगी सील केलेल्या मिळकती ज्यांनी आजतागायत थकबाकी भरली नाही, अशा मिळकतदारांना २०२३ अखेर थकीत कर भरून घेण्याबाबत प्रशासनाने आवाहन केले होते.

आवाहनाला प्रतिसाद न दिलेल्या ६५ मिळकतींवर महापालिकेचा बोजा चढविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कारवाईत साधारण ६५ मिळकती सील करण्यात आल्या होत्या. त्यानंतर २०२३-२४ या चालू वर्षात कर भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली. पहिल्या टप्प्यात मागील वर्षीच्या कारवाईत सील केलेल्या मिळकतींवर महापालिकेचा बोजा चढविण्यात येत आहे.

तसेच तीन लाख व त्यापेक्षा अधिक असलेल्या १ हजार १५० घरगुती मिळकतदारांबरोबरच व्यावसायिक मिळकतदारांवरदेखील या कारवाई संदर्भातील नोटिसा बजावण्यात येत आहे. तीन लाखापुढील थकबाकीदारांचे साधारण १७५ कोटी रुपये थकीत आहे. आठवड्याभरात नोटीस वाटपानंतर कारवाई मोहीम गतिमान करण्यात येणार आहे.

यांची आहे थकबाकी

- शासकीय कार्यालय, रेल्वे कार्यालय, विविध कंपन्याचे टॉवर, शाळा, महाविद्यालय यांच्यासह व्यावसायिक आणि घरगुती मिळकतदार यांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात तीन लाखापुढील थकबाकी असलेल्या मिळकतदार व व्यावसायिक यांना जप्ती नोटीस काढण्यात आले आहेत. गतवर्षी सील केलेल्या मिळकतींवरही बोजा चढविण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी मिळकत कर भरून सहकार्य करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.

- युवराज गाडेकर, कर आकारणी विभागप्रमुख, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()