नवीन 'सीपीं'चा दणका! विजापूर नाक्‍याचे वरिष्ठ PI पाटील निलंबित!

नवीन 'सीपीं'चा दणका! विजापूर नाक्‍याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील निलंबित!
कलवरी ऑर्केस्ट्रा बार प्रकरण : दोघांना पोलिस कोठडी; बार मालक फरार
कलवरी ऑर्केस्ट्रा बार प्रकरण : दोघांना पोलिस कोठडी; बार मालक फरारSakal
Updated on
Summary

पोलिस आयुक्‍त हरीश बैजल यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यावर ठोस कारवाई करत त्यांना थेट निलंबितच केले आहे.

सोलापूर : विजापूर रोडवरील नागेश ऑर्केस्ट्रा बार निर्बंध असतानाही सुरू राहिला कसा आणि त्याची माहिती तुम्हाला का नव्हती, असा जाब विचारत पोलिस आयुक्‍त हरीश बैजल (Commissioner of Police Harish Baijal) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्याचे (Vijapur Naka Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील (Senior Police Inspector Udaysinh Patil) यांच्यावर ठोस कारवाई करत त्यांना थेट निलंबितच केले आहे. तर डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्यासह आठ जणांना मुख्यालयात आणले आहे.

कलवरी ऑर्केस्ट्रा बार प्रकरण : दोघांना पोलिस कोठडी; बार मालक फरार
पदाचा गैरवापर, फसवणुकीचा ठपका! DCC सरव्यवस्थापक मोटे यांना नोटीस

विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील व डीबी पथकाचे प्रमुख शीतलकुमार कोल्हाळ यांची पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यात डीबी पथकातील राजकुमार तोळनुरे, श्रीरंग खांडेकर, पिंटू जाधव, शिवानंद भीमदे, अंबादास गड्डम, अतिश पाटील, इम्रान जमादार व राठोड या आठ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी अचानक केलेल्या तडकाफडकी बदल्यांमुळे शहर पोलिस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे.

30 ऑक्‍टोबर रोजी रात्री विजापूर रोडवरील नागेश डान्स बारवर सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांनी कारवाई केली होती. त्यात जवळपास 39 जणांवर कारवाई करण्यात आली. डान्स बारमध्ये सुरू असलेले अश्‍लील नृत्य व ग्राहकांची गर्दी पाहून त्यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावले होते. तरीही, डॉ. प्रीती टिपरे या स्वतः जाऊन डान्स बारवर कारवाई केली. कारवाईनंतर डॉ. प्रीती टिपरे यांनी कारवाईची माहिती पोलिस आयुक्‍त बैजल यांना दिली. त्यानंतर पोलिस आयुक्‍त बैजल यांनी ही कारवाई केल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

कलवरी ऑर्केस्ट्रा बार प्रकरण : दोघांना पोलिस कोठडी; बार मालक फरार
मोठ्या आवाजाचे फटाके उडवणाऱ्यांना जागेवरच एक हजारांचा दंड!

कामात हलगर्जीपणा चालणार नाहीच!

सर्वसामान्यांची सेवा करताना पोलिसांनी तत्पर राहायला हवे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून निर्बंध कायम आहेत. तरीही, विजापूर रोडवरील नागेश ऑर्केस्ट्रा बार सुरू राहिला. सहाय्यक पोलिस आयुक्त कारवाई करतात पण, तेथील स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना माहिती होत नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस आयुक्‍त बैजल यांनी स्पष्ट केले. अवैध व्यवसायात भागीदारी अथवा संबंध, कामात हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.