Solapur Crime News : तिघांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा; अंगावर पाणी पडल्याने एसटी चालकाला मारहाणीचे प्रकरण

एसटीचे वाहक आनंद सुखदेव आवटे हे २ एप्रिल २०२१ रोजी कोल्हापूर ते सोलापूर या मार्गावरून येते होते. सोलापूरकडे येताना पोखरापूरजवळ एसटीतील एका प्रवाशाने खिडकीतून पाणी बाहेर फेकले.
sentence 2 years of jail to three st driver beaten case solapur crime update
sentence 2 years of jail to three st driver beaten case solapur crime update Sakal
Updated on

Solapur News : राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बालाजी ऊर्फ अशोक काळे, दादा ऊर्फ धनराज अविनाश भोसले व आकाश वैजिनाथ भोसले (सर्वजण रा. पोखरापूर, ता. मोहोळ) यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांनी दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

एसटीचे वाहक आनंद सुखदेव आवटे हे २ एप्रिल २०२१ रोजी कोल्हापूर ते सोलापूर या मार्गावरून येते होते. सोलापूरकडे येताना पोखरापूरजवळ एसटीतील एका प्रवाशाने खिडकीतून पाणी बाहेर फेकले. पाणी अंगावर पडल्याने दुचाकीवरील दोघांनी गाडी आडवी लावून बस थांबविली. मागून दुसरी दुचाकी आली आणि त्यातील एकाने उतरून वाहकाच्या गच्चीला पकडून शिवीगाळ व मारहाण केली.

खाली ओढून लाथाबुक्क्यांनी त्यांनी मारहाण केली व दुचाकीवरून निघून गेले. उमाकांत कवडे यांनी सरकारी कामात अडथळा आणला व मारहाण केली, अशी फिर्याद मोहोळ पोलिसांत दिली. त्यानंतर पोलिसांनी संशयितांना पकडले आणि त्यांची ओळख परेड घेण्यात आली.

चालक उमाकांत कवडे व वाहक आनंद आवटे यांची साक्ष साक्ष महत्त्वाची ठरली. संशयितांतर्फे ॲड. महेश जगताप यांनी तर सरकारतर्फे ॲड. आनंद कुर्डुकर यांनी काम पाहिले. सहायक पोलिस निरीक्षक एस.एम. माने यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. कोर्टपैरवी म्हणून पोलिस हवालदार राजू पवार यांची मदत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.