लवकरच तालुक्यातील 36 गावांतील नागरिकांचे घराचे स्वप्न दृष्टिक्षेपात येणार आहे.
वडाळा (सोलापूर) : उत्तर सोलापूर तालुक्यात (North Solapur taluka) पंतप्रधान आवास योजनेसाठी (Prime Minister's Housing Scheme) सात हजार 282 घरकुल लाभार्थ्यांचे ऑनलाइन जॉबकार्ड लिंक करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तालुक्यातील एकूण 92 टक्के काम पूर्ण झाले आहे. यामुळे लवकरच तालुक्यातील 36 गावांतील नागरिकांचे घराचे स्वप्न दृष्टिक्षेपात येणार आहे. सध्या तालुक्यातील घरकुल सात हजार 282 प्रस्तावांपैकी सध्या सहा हजार 682 लाभार्थ्यांचे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत (MREGS) जॉबकार्ड ऑनलाईन लिंक करण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार आहे. यानंतर ही यादी शासनाच्या वरिष्ठ पातळीवर अंतिम पात्रतेसाठी पाठविली जाणार आहे. शासनाच्या मंजुरीनंतर अंतिम यादी ग्रामपंचायतीस सादर होणार आहे. शासनाचे मार्गदर्शक आदेश प्राप्त झाल्यानंतर घरकुल लाभार्थांना मंजुरी आदेश मिळणार आहे. (Seven thousand proposals were received for the Prime Minister's Housing Scheme in North taluka-ssd73)
घरकुल लाभार्थ्यांची जॉबकार्ड ऑनलाइन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून काम पूर्ण होताच ही यादी वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठाविण्यात येणार आहे. यानंतर शासन आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
- डॉ. जास्मीन शेख, गटविकास अधिकारी, उत्तर सोलापूर
पंतप्रधान आवास योजनेसाठी गावनिहाय प्रस्ताव असे...
भागाईवाडी - 59
कोंडी - 646
पडसाळी - 122
वांगी - 47
कळमण - 57
गुळवंची - 180
तळे हिप्परगा - 342
हगलूर - 81
एकरुक - 37
दारफळबीबी - 312
सेवालाल नगर - 99
होनसळ - 109
खेड - 124
हिरज - 315
राळेरास - 37
तेलगाव - 112
पाथरी - 85
तिऱ्हे - 266
बेलाटी - 124
साखरेवाडी - 129
वडाळा - 135
भोगाव - 147
बाणेगाव - 135
नान्नज- मोहितेवाडी - 400
मार्डी- 681
अकोलेकाटी - 362
कारंबा - 188
रानमसले - 363
पाकणी 240
नरोटेवाडी - 50
दारफळगावडी - 139
कवठे - 246
शिवणी - 62
डोणगाव - 266
नंदूर - 60
कौठाळी - 225
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.