महाविद्यालयांमध्ये केवळ 77 टक्के विद्यार्थ्यांचीच हजेरी !

विद्यापीठाच्या बैठकीला 29 प्राचार्यांची दांडी! लसीच्या निकषामुळे विद्यार्थी अनुपस्थित
कोरोना लसीच्या निकषामुळे 77 टक्के विद्यार्थी अनुपस्थित
कोरोना लसीच्या निकषामुळे 77 टक्के विद्यार्थी अनुपस्थित Sakal
Updated on
Summary

कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस न टोचल्याने जवळपास 77 टक्‍के विद्यार्थी बुधवारी कॉलेजला आलेच नाहीत.

सोलापूर : राज्य सरकारच्या निर्देशानुसार बुधवारी सर्व उच्च महाविद्यालयांचे टाळे उघडण्यात आले. परंतु, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. या बैठकीला 111 पैकी 82 प्राचार्यांनीच उपस्थिती लावल्याची माहिती विद्यापीठातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. दुसरीकडे, कोरोनावरील (covid-19) प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस न टोचल्याने जवळपास 77 टक्‍के विद्यार्थी आलेच नाहीत, असेही सांगण्यात आले.

कोरोना लसीच्या निकषामुळे 77 टक्के विद्यार्थी अनुपस्थित
एज्युकेशन लोन-व्हिसासाठी संघर्ष! अखेर 'त्याने' अमेरिकेत पाय रोवलेच

कोरोनाच्या दोन्ही लाटा आता शांत झाल्या असून, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार बुधवारपासून (ता. 20) सर्व महाविद्यालये सुरू झाली. मात्र, महाविद्यालय तथा विद्यापीठातील प्रात्यक्षिकांसाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस टोचलेले असावेत, असा निकष लागू करण्यात आला आहे. दुसरीकडे, कोरोना काळात क्‍वारंटाईन सेंटर म्हणून अधिगृहीत केलेली हॉस्टेल्स अजूनपर्यंत संबंधितांच्या ताब्यात देण्यात आलेली नाहीत. प्रात्यक्षिक वर्गात उपस्थित राहण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्येक बॅचसाठी केवळ 20 विद्यार्थीच उपस्थित राहतील, असाही निकष लावण्यात आला आहे. या सर्व निकषांमुळे महाविद्यालये सुरू झाली, परंतु विद्यार्थ्यांचा तेवढा प्रतिसाद दिसून आला नाही. विद्यापीठाने ऑनलाइन बैठकीच्या माध्यमातून सर्व महाविद्यालयांतील प्राचार्यांच्या अडचणी जाणून घेतल्या असून, त्यावर लवकरच तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही विद्यापीठ प्रशासनाने दिल्याचेही सांगण्यात आले.

विद्यापीठाची सद्य:स्थिती...

  • संलग्नित महाविद्यालये : 111

  • अंदाजित प्रवेशित विद्यार्थी : 83,000

  • बुधवारी सुरू झालेली महाविद्यालये : 111

  • विद्यार्थ्यांची अंदाजित उपस्थिती : 23 टक्‍के

शासनाच्या निर्देशानुसार बुधवारी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये सुरू झाली. कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जात आहे. प्रात्यक्षिक वर्ग ऑफलाइन सुरू झाले असून शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत पांरपरिक अभ्यासक्रम ऑनलाइनच शिकवला जाणार आहे.

- डॉ. सुरेश पवार, प्रभारी कुलसचिव, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

कोरोना लसीच्या निकषामुळे 77 टक्के विद्यार्थी अनुपस्थित
विद्यापीठाकडून प्रवेश अन्‌ परीक्षा शुल्कवाढ नाहीच!

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा द्या अहवाल

राज्य सरकारने निर्देश दिल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने सर्व प्राचार्यांना महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात पत्रव्यहार केला. त्यानुसार बुधवारी महाविद्यालये उघडली, परंतु कॉलेजमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने लस टोचलेली असायला हवी, असा निकष लावण्यात आला होता. त्यामुळे बरेच विद्यार्थी प्रवेशद्वारावरूनच परतले. दरम्यान, जिल्ह्यातील किती महाविद्यालये सुरू झाली, किती विद्यार्थी उपस्थित राहिले, यासंदर्भातील अहवाल द्यावा, असे विद्यापीठाने महाविद्यालयांना कळविले आहे. तो अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.