22 सप्टेंबरला प्रस्ताव पाठविण्यात आला; मात्र राज्यपालांकडून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
सोलापूर : विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना मानद डी.लिट. (D. Litt.)) पदवीने सन्मानित करण्यास मान्यता मिळावी, असा प्रस्ताव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याकडे पाठविला आहे. त्यामध्ये ग्लोबल टीचर पुरस्कारविजेते रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disle) यांचेही नाव आहे. 22 सप्टेंबरला प्रस्ताव पाठविण्यात आला; मात्र राज्यपालांकडून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. (Sharad Pawar and Nitin Gadkari will get honorary D.Litt. From Solapur University)
देशाचे माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी सैन्य दलात (Military) पहिल्यांदा महिलांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शेतकऱ्यांविषयी महत्त्वाचे निर्णय घेऊन त्यांच्या जीवनात क्रांती घडविण्याचा प्रयत्न केला. राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण देण्याचाही त्यांनी निर्णय घेतला. क्रिकेटमध्ये (Cricket) तरुणांना संधी मिळावी म्हणून 'आयपीएल'ची (IPL) सुरवात केली. त्यांच्या या भरीव योगदानाबद्दल त्यांना विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी द्यावी, अशी मागणी सिनेट सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांनी केली. तर, जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी देशभर महामार्गांचे जाळे उभारून वाहतूक व्यवस्था सुलभ करून दिल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही विद्यापीठाने मानद डी.लिट. पदवी देऊन सन्मानित करावे, अशी मागणी केली. दुसरीकडे,
शैक्षणिक क्षेत्रात दर्जेदार बदल घडविण्यात योगदान दिलेले जिल्हा परिषदेच्या शाळेतील ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांनाही विद्यापीठाने डी.लिट. पदवी द्यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्या तिन्ही प्रस्तावांना मान्यता द्यावी, असे पत्र विद्यापीठाने सप्टेंबरमध्ये कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे सचिव संतोष कुमार यांना पाठविला आहे. मात्र, त्यावरील अंतिम निर्णय झाला नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुढील वर्षी होणार सन्मान?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा वर्धापन दिन 1 ऑगस्ट रोजी असतो. तर जानेवारी 2022 मध्ये दीक्षांत समारंभ होणार आहे. विद्यापीठाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले या तिन्ही दिग्गजांना डी.लिट. पदवी देण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविला आहे. त्यावर आगामी काही दिवसांत निर्णय अपेक्षित असून पदवीदान समारंभ जानेवारीत होणार की विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त 1 ऑगस्ट रोजी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.