Latest Solapur News: मतदार संघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले गेल्या पंधरा दिवसातील प्रयत्न व अनिल सावंत यांच्या सामाजिक उपक्रमाची दखल घेत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला. पवारांनी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाची दखल घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याची जबाबदारी पार पडल्यामुळे भगीरथ भालके हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.मात्र त्यांना वेळेत एबी फॉर्म देण्याबाबत पक्षाने भूमिका न घेतल्याने ऐनवेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 45 हजाराचे मताधिक्य राहिल्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठा कडून ही जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला पदरात पाडून घेतली व भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली