Sharad Pawar: राज्यातील अजून एक भाजप नेता जाणार पवारांच्या पक्षात? लवकरच घेणार निर्णय!

Solapur Political News:समाजामध्ये वाईट लोकांचे प्रमाण वाढले असले तरी चांगली माणसे सध्या समाजासमोर आली पाहिजेत.
sharad pawar ncp solapur
sharad pawar ncp solapur sakal
Updated on

Solapur latest News: तुमची जी भावना आहे ती मला निर्णय घेण्यास भाग पाडणार आहे.कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण राजकारण करत असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन सध्या पितृपक्ष सुरू आहे चार दिवस थांबा.त्यानंतर भूमिका जाहीर करू असे प्रतिपादन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी तालुक्यातील जालिहाळ येथे बोलताना व्यक्त केले.

पंढरपूर विधानसभेच्या आखाड्यात प्रशांत परिचारांची भूमिका निर्णायक वळणावर येऊन ठेपली असून दोन दिवसापूर्वी कोल्हापूर येथे झालेल्या कार्यकर्ता संवाद बैठकीत त्यांनी हजेरी लावली लावल्यामुळे ते भाजप सोडणार नाहीत हे स्पष्ट झाले होते.मात्र जालिहाळ येथे विविध स्पर्धा परीक्षेतील आप्पासाहेब सोलनकर,अंकुश निळे सुनील पाटील,संजय डोरले, यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

sharad pawar ncp solapur
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या कोल्हापूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष पदी आदिक जाधव यांची निवड

यावेळी ते बोलतहोते.व्यासपीठावर दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील, संचालक गौरीशंकर बुरकुल, औदुंबर वाडदेकर,अजित जगताप, राजेद्र पाटील,महादेव लुगडे,तानाजी कांबळे,अशोक माळी,बबलू सुतार,सचिन चौगुले,माधवानंद आकळे,सुनिल थोरबोले,श्रीकांत गणपाटील,विष्णू मासाळ,शशिकांत कस्तुरे,आदीसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

प्रशांत परिचारक यांचे राजकीय भूमिका काय असेल यासाठी या परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या समारंभा दरम्यान बोलताना माजी सरपंच सचिन चौगुले यांनी तुतारीतून निवडणूक लढवावी अशी मागणी केली तर दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी व्यासपीठावर बसून आपणाला भाषण देऊन चालणार नाही लोकप्रतिनिधी आपल्या विचाराचा करण्यासाठी प्रत्यक्ष काम करावे लागणार आहे.

यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की, सध्या महिलांची संख्या देखील 50% झाल्यामुळे महिलांना देखील काम करण्यासाठी अधिक संधी दिली पाहिजे तर 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी वेगवेगळ्या विषयावरील नामांकित व्यक्तींना पाचारण करून गाव पातळीवर प्रबोधन करण्याची गरज आहे सध्या समाजामध्ये वाईट लोकांचे प्रमाण वाढले असले तरी चांगली माणसे सध्या समाजासमोर आली पाहिजेत.

चांगल्या माणसांना पुढे आणण्याची जालीहळ ग्रामस्थांची भूमिका कौतुकास्पद आहे.पोट निवडणुकीत ज्या भावनेने आपण मतदान केले जात-पात पक्ष याच्या पलीकडे जाऊन वेगळ्या प्रकारचे राजकारण करावे अशी आपली भूमिका होती.

पण दुर्दैवाने तसे झाले नाही समाजाचा हिताचा विचार करून निर्णय झाला पाहिजे ही अपेक्षा होती दुर्दैवाने या अपेक्षांचा भंग झाला. शासन व्यवस्थेत लोकप्रतिनिधींनी ज्यांनी मतदान केले ते आपलेच ज्यांनी नाही केले ते आपलेच या भूमिकेने काम केले पाहिजे

sharad pawar ncp solapur
Sharad Pawar: 'त्या' लोकांना पुन्हा पक्षात नाही मिळणार प्रवेश; पवारांच्या नेत्याचे महत्वाचे विधान!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.