Sharad Pawar Resigns: शरद पवारांनीच 'गॉडफादर' रहावे ही तर राष्ट्रवादीच्या शिलेदारांची इच्छा!

निर्णायक वळण सोलापूर जिल्ह्याच्या भविष्यातील राजकारणाचे...
sharad pawar
sharad pawaresakal
Updated on

सोलापूर जिल्हा तसा नेहमीच राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलेला. आजवर बारामतीकरांनी पर्यायाने शरद पवारांनी या जिल्ह्याचे पालकत्व स्विकारलेले. सोलापूर जिल्हा हा तसा शरद पवारांचा लाडका जिल्हा.

या जिल्ह्यातील जणू काही अणु-रेणूशी शरद पवारांचा संबंध.आपल्या साठ वर्षाच्या राजकीय वाटचालीत शरद पवारांनी या जिल्ह्यावर जाणीवपूर्वक लक्ष ठेवलेले. आपला लाडका जिल्ह्या म्हणून तसे शरदरावांनी आजवर खूप काही सारे या जिल्ह्याला दिलेले. शरद पवार म्हणजे सोलापूर जिल्ह्यासाठी ‘परीसस्पर्श’ असं ते समीकरण.

मात्र, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडले. सेवानिवृत्तीची घोषणा केली. तिथं महाराष्ट्रात राजकीय कल्लोळ माजला. सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या गोटातदेखील खळबळ उडाली.गॉडफादर शरद पवारांनी या निर्णयावरून माघार घ्यावी, असा आक्रोश कार्यकर्त्यांकडून सुरु झाला.

sharad pawar
Sharad Pawar Resigns: 'पवारांच्या निर्णयाचा देशपातळीवर परिणाम', काँग्रेसच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे नेते, पुढारी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भावनेची कदर करुन राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासंदर्भात दोन दिवसातच म्हणते शुक्रवारी (ता. ५) निर्णय घोषित करावा, असे समितीला शरद पवारांनी सांगितले. निर्णयाच्या दोन दिवसांचे काऊंटडाऊन सुरु झाले. दोन दिवसानंतर जेव्हा अनपेक्षीत निर्णयाचा स्फोट होईल, तेव्हा सोलापूर जिल्ह्याचे राजकारण नव्या निर्णायक वळणावर जाऊ शकते.

गेली सहा दशके राजकारणामधील ज्या जादुई नावाभोवती केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर दिल्लीचे राजकारण फिरते. त्या शरद पवारांनी आपल्या राजकीय प्रदीर्घ वाटचालीत अनेक धक्के दिले.धक्कातंत्र हे शरद पवारांचे वैशिष्ट्ये. पवारांच्या धक्क्यामधून काहीजण सावरले तर काहीजण कायमचे‘क्लीनबोल्ड’ झाले.

काहींना कायमचा राजकीय संन्यास घ्यावा लागला. ‘जोर का झटका धीरेसे लगा’ असाच श्री. पवारांच्या धक्यांबाबतीतचे वर्णन. दरम्यान, धक्कातंत्राचा अवलंब करुन राजकारणात भूकंप घडविणाऱ्या शरद पवारांनी मंगळवारी (ता.२) रोजी असा काही धक्का दिला, ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. ज्याचे तीव्र परिणाम राज्यभर अजूनही उमटताहेत. सोलापूर जिल्ह्यात या भूकंपाचे परिणाम उमटले नाही तर नवलच.

sharad pawar
Sharad Pawar Resigns: 'जयंत पाटील नैराश्यातून राष्ट्रवादी सोडून जातील'; भाजप नेत्याची NCPवर टीका

शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीनंतरच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्याचे अस्तित्व काय असेल? याबद्दल आता राजकीय जाणकारांसह सर्वच क्षेत्रामधील लोकांमध्ये चर्चा, आडाखे, तर्क-विर्तकांचे मायंदाळ पीक आले आहे. मोदी लाट, सन २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी आणि

तद्‌नंतरचा काळ ही अपवादात्मक परिस्थिती सोडली तर सोलापूर जिल्हा हा तसा शरद पवारांच्या विचारांचा जिल्हा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा तसा बालेकिल्ला. तथापि, शनिवारी ५ तारखेला राष्ट्रवादीच्या

राष्ट्रीय अध्यक्षपदावर नवा चेहरा आणण्याचा निर्णय पक्का झाला, त्याशिवाय आपल्या राजकीय सेवानिवृत्तीवर शरद पवार कायम राहिले तर त्याचे दूरगामी परिणाम सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर उमटणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी फळी आहे. शरद पवार, अजित पवार असे दोन गट या जिल्ह्यात आहेत. अजित पवारांना मानणारा स्वतंत्र गट येथे असला तरी शरद पवारांचेच नेतृत्व शेवटी हा गट मानणार हे त्रिकालाबाधीत सत्य असल्याचे मानले जाते.

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचे सिंहासन देण्याचा विचार झाला, खुद्द शरद पवार यांनी या जिल्ह्यातील पक्षामधील सर्वांचीच समजूत काढली तर आक्रोश करणारे कार्यकर्ते खासदार सुप्रिया सुळेंचे नेतृत्व स्विकारतील असे मानले जाते.

तर अजित पवार अशावेळी आपल्या खास मर्जीमधील समर्थकांना काय कानगोष्टी सांगातात हे पाहणेदेखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.