पवार साहेब माझ्या मुलीला वाचवा : काळे कुटुंबियांची आर्त हाक

युक्रेनच्या संवेदनशील युद्धजन्य परिस्थिती असलेल्या खारकिव्ह शहरात अडकली असून तुमच्या मुलीसारखी मला एकच मुलगी आहे
Sharad Pawar daughter Russia Ukraine war
Sharad Pawar daughter Russia Ukraine warsakal
Updated on

बार्शी : शहरातील उपळाई रस्त्यावर राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील एकुलती मुलगी कल्याणी काकासाहेब काळे ( वय 19 ) युक्रेनच्या संवेदनशील युद्धजन्य परिस्थिती असलेल्या खारकिव्ह शहरात अडकली असून तुमच्या मुलीसारखी मला एकच मुलगी आहे माझे शरीर येथे आहे आणि प्राण तिच्याजवळ आहेत अशी आर्त हाक काकासाहेब काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष , ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बोलून दाखवताच सुमारे एक तास त्यांचेशी चर्चा करुन भारत सरकारच्या यंत्रणेशी चर्चा केली अन् जीव भांड्यात पडला.

युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती बिकट होत असताना निम्म्यापेक्षा अधिक खारकिव्ह शहरावर क्षेपणास्त्रांचा मारा होत असताना मुलगी कल्याणी परत येती का नाही याची चिंता वाटत होती अखेर बारामती येथे जाऊन काळे कुटुंबियांनी पवार यांचे घरी जाऊन समस्या सांगितली.

वजा पाच अंशापेक्षाही कमी तापमान , बंकरच्या बाहेर पडता येत नाही , रस्त्यावर बर्फ साठवलेला अशी परिस्थिती असून क्षेपणास्त्रांचा मारा सुरु आहे जीव मुठीत घेऊन आहोत मी भारतात परत येऊन भेटू शकते का नाही असे मुलगी कल्याणी हिने फोनवर सांगितल्याचे त्यांनी पवार यांना सांगितले.

सुमारे एक तास पवार साहेबांनी अनेकांना फोन लावले मला बसवून ठेवले पूर्ण माहिती घेतल्यानंतर व्यवस्था होत आहे लवकरच कल्याणी परत येईल असे आश्वासन दिल्यानंतर जीव भांड्यात पडला. बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान कल्याणीचा पालकांना फोन आला असून तिने प्रवास करतानाचा एक व्हिडिओ पाठवला आहे पूर्ण रस्त्यावर बर्फ दिसत असून तिने सांगितले की, आम्ही 17 भारतीय विद्यार्थी हंगेरी बॉर्डरवर सध्या असून सर्व जण सुरक्षित पोहचलो आहोत.

भारत सरकारच्या दूतावासानुसार व्हिसाशिवाय देशात येण्याची परवानगी देण्यात आली आहे नोंदणीसाठी विमानतळावर रांग लागली असून आम्ही रांगेमध्ये उभे आहोत विमान मिळताच भारतात पोहचत आहोत सुरक्षित ठिकाणी आहोत असेही कल्याणी हिने पालकांना सांगितले आहे. कल्याणीच्या पालकांचा जीव भांड्यात पडला असून मुलगी येत असल्याची माहिती मिळताच डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असताना पवार साहेबांनी केलेल्या मदतीमुळेच मुलगी आली अशी भावना त्यांनी ' सकाळ ' शी बोलताना व्यक्त केली .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.