Sharad Pawar: शरद पवारांकडून 11 नेत्यांच्या मुलाखती; तर परिचारिकांनी घेतली फडणवीसांनी भेट

Sharad Pawar: शरद पवारांकडून 11 नेत्यांच्या मुलाखती; तर परिचारिकांनी घेतली फडणवीसांनी भेट

Latest Solapur News: भालके यांनी आपल्या वडिलांनी तीन वेगवेगळ्या पक्षातून विधानसभा लढवली मतदाराशी कायम नाळ ठेवली तीच भूमिका मी कायम ठेवून मतदाराशी संपर्क ठेवली.
Published on

Latest Mangalvedha News: पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून 11 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या यादरम्यान समर्थकातून तुतारीवर लढावे अशी मागणी होत असलेल्या प्रशांत परिचारकांनी सोलापूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चाचपणीसाठी सक्रिय झाले. राष्ट्रवादीची उमेदवारी मुलाखत घेतलेल्या मधील उमेदवाराला मिळणार की नवीन चेहरा येणार याकडे लक्ष लागले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान आ. समाधान आवताडे यांनी 1100 कोटीच्या विकास कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करत आपले राजकीय शक्तीप्रदर्शन केले. याशिवाय आगामी विधानसभेची दावेदारी देखील निश्चित केले तर निसटच्या मताने पराभूत झालेले भगीरथ भालके यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून या मतदारसंघात गावभेट दौरे करत मतदारांचा आपणास पाठिंबा आहे.

Sharad Pawar: शरद पवारांकडून 11 नेत्यांच्या मुलाखती; तर परिचारिकांनी घेतली फडणवीसांनी भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या कोल्हापूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष पदी आदिक जाधव यांची निवड

याच जोरावर आपण निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहे तर भैरवनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी देखील विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदाराची संपर्क ठेवत निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी केली व वसंतनाना देशमुख, नागेश भोसले, सुभाष भोसले, चंद्रशेखर कोंडूभैरी,प्रथमेश पाटील,नागेश फाटे,डाॅ.संजय भोसले हे सध्या निवडणुकीच्या आखाड्यात तुतारीवर लढण्यासाठी इच्छुक आहेत काल पुणे येथे झालेल्या मुलाखतीस भगीरथ भालके, अनिल सावंत ,वसंतनाना देशमुख, सुभाष भोसले ,नागेश भोसले, नागेश फाटे, चंद्रशेखर कोंडूभैरी, प्रथमेश पाटील यासह तब्बल 11 जणांनी मुलाखती दिल्या.

यादरम्यान आपापल्या मतदारसंघात केलेले काम सांगताना अनिल सावंत यांनी पाणी नसलेल्या भागात आपण साखर कारखानदारीच्या माध्यमातून तरुणांना रोजगार दिला एकही हंगाम खंडित न करता कारखाना चालवला विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क असल्याने आपणास उमेदवारी मिळावी अशी मागणी केली. भगीरथ भालके यांनी आपल्या वडिलांनी तीन वेगवेगळ्या पक्षातून विधानसभा लढवली मतदाराशी कायम नाळ ठेवली तीच भूमिका मी कायम ठेवून मतदाराशी संपर्क ठेवली.

जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क ठेवून आहे गत निवडणूक निसटत्या मताने पराभूत झाला असला तरी पराभवातील कारणे शोधून मी काम केले आहे शिवाय लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे काम केल्यामुळे संधी मिळावी अशी मागणी केली तर वसंत देशमुख यांनी सिनेट सदस्य पासून जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या समितीवर काम करत या मतदारसंघातील विकास कामे केली असल्याने अशी मागणी केली.

Sharad Pawar: शरद पवारांकडून 11 नेत्यांच्या मुलाखती; तर परिचारिकांनी घेतली फडणवीसांनी भेट
Sharad Pawar: याला म्हणतात नियती! ज्यांना पवारांनी घरी बसवलं, त्यांनाच आता विधानसभेत पाठवणार...

चंद्रशेखर कौडूभैरी यांनी नगरसेवक ते उपनगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून वेगवेगळ्या पदावर काम केल्याने राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी अशी मागणी केली याशिवाय नागेश भोसले, नागेश फाटे, डॉ संजय भोसले यांनी देखील तुतारी चिन्हावर

निवडणूक लढायला संधी द्यावी अशी मागणी केली. तर राहुल शहा यांनी आजारी असल्याच्या कारणास्तव मुलाखतीला जाण्याचे टाळले. माजी आमदार प्रशांत परिचारकांनी तुतारीवर लढावे अशी मागणी त्यांच्या समर्थकांत केली जात असली तरी राष्‍ट्रवादीच्या मुलाखतीकडे पाठ फिरवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्याला दांडी मारत दुसऱ्या दिवशी सोलापूर येथील दौऱ्यात हजेरी लावत मतदार संघाचा कानोसा घेण्यास सुरुवात केली.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची संभाव्य उमेदवारी मुलाखत घेतलेल्या मधील उमेदवाराला मिळणार की ऐनवेळी नवीन चेहरा चेहऱ्याला संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

Sharad Pawar: शरद पवारांकडून 11 नेत्यांच्या मुलाखती; तर परिचारिकांनी घेतली फडणवीसांनी भेट
Sharad Pawar: आरक्षण मुद्द्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, वाचा ते नक्की काय म्हणाले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.