मुख्यमंत्र्यांचा पक्ष शोधतोय अस्तित्व! नगरपंचायतीसाठी मिळेनात उमेदवार

मुख्यमंत्र्यांचा पक्ष शोधतोय अस्तित्व! नगरपंचायतीसाठी मिळेनात उमेदवार
Shiv Sena
Shiv Sena
Updated on
Summary

शिवसेनेने जिल्ह्यातील सर्व ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावर निवडणुका लढविण्याचा विडा उचलाला आहे; मात्र...

सोलापूर : सध्या जिल्ह्यातील मुदत संपलेल्या माढा (Madha) व नव्या सुरू झालेल्या नातेपुते (Natepute), श्रीपूर (Shripur) - महाळुंग (Mahalung), माळशिरस (Malshiras) आणि वैराग (Vairag) नगरपंचायतीच्या निवडणुकीची धूम सुरू आहे. सध्या शिवसेनेने (Shiv Sena) जिल्ह्यातील सर्व ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावर निवडणुका लढविण्याचा विडा उचलाला आहे. मात्र, माढा वगळता कुठेही शिवसेनेसाठी समाधानकारक चित्र नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा पक्ष असूनही शिवसेना जिल्ह्यात स्वत:चे अस्तित्व शोधत आहे.

Shiv Sena
वकीलसायबांवर अन्याय झालाय की !

शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे ऐनवेळी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या अंगावर मूठभर मांस चढले. सतत रस्त्यावर राडे करणारा पक्ष सत्ताधारी झाला. मात्र, या सत्तेचा फायदा सामान्य शिवसैनिकांना आणि पक्ष म्हणून संघटनात्मक बळ वाढविण्यासाठी झालेला अजूनही दिसत नाही. 'शतप्रतिशत शिवसेना' असा मनसुबा मनी धरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क मोहीम आखून दिली. शिवसैनिक कामाला लागले. शहर- जिल्ह्यात बैठका, मेळावे झाले. शहरात शिवसेनेचे वजन वाढू लागले. मात्र, ऐनवेळी फुटाफुटीची धूम उठली. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर आखलेल्या शिवसंपर्क मोहिमेला फळ येण्यापूर्वीच मोहीम कोमेजते की काय, असे चित्र पहिल्याच निवडणुकीत दिसू लागले आहे.

जिल्ह्यातील माढा, नातेपुते, श्रीपूर- महाळुंग, माळशिरस आणि वैराग नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत यश मिळविण्यासाठी शिवसेना धडपडत आहे. मात्र, माढा वगळता कुठेही आशादायी चित्र नाही. श्रीपूर-महाळुंग, नातेपुते, माळशिरस या एकाच तालुक्‍यातील तीन नगरपंचायतींची निवडणूक होत आहे. मात्र, येथे शिवसेनेला उमेदवार मिळणेही मुश्‍कील असल्याची स्थिती आहे. माळशिरस तालुक्‍यात नावापुरती शिवसेना आहे. एकही प्रबळ उमेदवार पक्षाकडे नाही. श्रीपूर- महाळुंगमध्ये इतर पक्षांनी तिकीट नाकारलेल्या नाराजांना सोबत घेऊन एकाच घरात दोन- दोन उमेदवाऱ्या देत निवडणुका लढवण्याची वेळ आली आहे. नातेपुतेतील काही शिवसैनिक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या गटात तर काही शिवसैनिक माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड. भानुदास राऊत यांच्या गटात सामील झाले आहेत. पक्षनिहाय निवडणूक येथे अशक्‍य झाली आहे. स्थानिक परिस्थिती व जातीय समीकरणे पाहून शिवसैनिक विभागला आहे.

माढ्यात मात्र चित्र वेगळे आहे. येथील चवरे आणि कानडे गट शिवसेनेबरोबर आहेत. माढा शहराध्यक्ष शंभूराजे साठे यांचे सामजिक कार्य व विविध आंदोलनांतील सहभाग यामुळे माढा नगरपंचातयतीमध्ये शिवसेनेला आशादायी चित्र आहे. 17 जागेच्या या नगरपंचायतीला 4 ओबीसीच्या जागा कमी झाल्या तरी 13 ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे चिन्ह येथे झळकणार आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांचा तालुका असून त्यांना मानणारा वर्ग माढा शहरात मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे शिवसेनेला माढा नगरपंयाचतीच्या निवडणुकीत आशादायी चित्र आहे.

माजी मंत्री दिलीप सोपल हे शिवसेनेत आल्याने वैरागमध्ये देखील आशादायी चित्र निर्माण होण्यास काहीच हरकत नव्हती. मात्र, दिलीप सोपल यांनी आपले सर्व पत्ते अद्यापही उघड केले नाहीत. सुरवातीलाच त्यांनी शिवसेनेऐवजी आघाडी करून वैराग नगरपंचायत लढविण्याचा इरादा बाळगला होता. आजही येथील उमेदवारांनी शिवसेनेकडून एक व अपक्ष एक असे दोन-दोन अर्ज दाखल केले आहेत. यामुळे दिलीप सोपल हाती शिवधनुष्य घेणार की, स्वत:च्या आघाडीवर निवडणूक लढवणार यावर येथील शिवसेनेचे गणित अवलंबून आहे.

Shiv Sena
'तू बडा की मैं बडा!' सत्ता अंगी भिनली, बेशिस्तीने कळस गाठला

अंतर्गत वादाचा फटका

शहर व जिल्ह्यातील शिवसेनेला अंतर्गत वादाचा सतत फटका बसलेला आहे. पंधरा दिवसांपूर्वी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्याबद्दल खासदार विनायक राऊत यांच्याकडे अनेक तक्रारी गेल्या. मात्र, चारही प्रमुखांच्या धडपडीनंतरही जिल्ह्यातील इतर नगरपंचायतीमध्ये समाधानकारक स्थिती नाही. मात्र, संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्या समर्थकांच्या नगरपंचायतीमध्येच आशादायी चित्र आहे. प्रत्येक तालुक्‍यातील दुफळीमुळेच शिवसेनेला फटका बसत असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.