तीन पथके नेमूनही लागेना वैरागच्या शिवराजचा शोध!

तीन पथके नेमूनही लागेना वैरागच्या शिवराजचा शोध!
तीन पथके नेमूनही लागेना वैरागच्या शिवराजचा शोध!
तीन पथके नेमूनही लागेना वैरागच्या शिवराजचा शोध!Sakal
Updated on
Summary

या घटनेला तब्बल 21 दिवस उलटले, मात्र त्याचा अद्याप तपास लावण्यात वैराग पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल तर्क- वितर्क लावले जात आहेत.

वैराग (सोलापूर) : आई-वडील कामाला गेले असता वैराग (ता. बार्शी) (Barshi Taluka) येथून नऊ वर्षाचा मुलगा वाळूज (ता. मोहोळ) (Mohol) येथे आजीकडे जाण्यासाठी 2 ऑक्‍टोबरला घरातून न सांगता निघून गेला. मात्र तो आजीकडे पोचलाच नाही. या घटनेला तब्बल 21 दिवस उलटले, मात्र त्याचा अद्याप तपास लावण्यात वैराग पोलिसांना (Vairag Police) यश आले नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल तर्क- वितर्क लावले जात आहेत.

तीन पथके नेमूनही लागेना वैरागच्या शिवराजचा शोध!
हिवाळ्यात आरोग्याची काळजी! पौष्टिक आहारासह सांध्यांना हवी मालिश

येथील शिवराज जोतिराम सुतार (वय 9) यास फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलाची आई रूपाली सुतार यांनी वैराग पोलिसांत दिल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध 2 ऑक्‍टोबर रोजी गुन्हा दाखल झाला. शिवराज सुतार याचे मूळ गाव वाळूज (ता. मोहोळ) असून सुमारे 10 वर्षांपूर्वी त्याचे वडील कामानिमित्त वैरागला आले आहेत. शिवराज हरवल्याची घटना समजताच त्याची वैरागमधील नातेवाईक, मुलाचे मित्र, वाळूज येथे तत्काळ चौकशी केली. दरम्यानच्या काळात वैराग पोलिस स्टेशनने त्याचा शोध घेण्यासाठी तीन पथके नेमली. पोलिस निरीक्षक विनय बहिर, सहाय्यक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे, तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड व त्यांचे सहकारी यांनी वैराग, नरखेड, वाळूज, मोहोळ, उस्मानाबाद आदी ठिकाणी कसून तपास केला. पोलिसांनी घातपात, अपहरण, अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातूनही तपास केला आहे, शिवराजच्या आई-वडिलांना जेथून खबर मिळाली तिथे जाऊन तपास केला; मात्र काहीच हाती आले नाही.

शिवराज हरवल्याच्या काळात वाळूजच्या भोगावती नदीला पूर आला होता. शिवराज वैरागहून 2 ऑक्‍टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता निघाला. दहिटणेत चार वाजता होता. पाच ते सहाच्या दरम्यान तो वाळूज नदीकाठच्या पेरूच्या बागेत पेरू खाण्यासाठी गेला असावा; कारण स्थानिक नागरिकांनी भोगावती नदीच्या पुरात 8 ते10 वर्षाच्या मुलाला वाहून जाताना पाहिल्याचे सांगितले. याबाबत आठ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे दुर्घटना घडली असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी नदी पात्राच्या दोन्ही काठचा सुमारे 20 किलोमीटर परिसरात तपास घेतला; मात्र कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नसल्याने वैराग पोलिस अंतिम निर्णयापर्यंत अद्याप आले नाहीत.

तीन पथके नेमूनही लागेना वैरागच्या शिवराजचा शोध!
विधान परिषदेच्या आठ जागांसाठी पुन्हा 'महाविकास'विरुद्ध भाजप!

शिवराजचे आई-वडील म्हणतात...

शिवराज कुठल्या तरी गंभीर संकटात असावा, त्यामुळे त्याचा आमच्याशी संपर्क होऊ शकत नाही. तो हरवल्या दिवसापासून आमचाही दररोज शोध सुरूच आहे. बार्शी, पंढरपूर, तुळजापूर, परांडा आदी भागात शोध घेतला. 12 ऑक्‍टोबर रोजी त्याला शोधण्यासाठी मोहोळ शहरात त्याचा फोटो दाखवला असता त्याला पाहिल्याचे काहीजण बोलतात. त्यामुळे आम्हाला तो सापडण्याची आशा असून, पोलिसांनी कसून तपास करण्याची अपेक्षा आहे.

बातमीदार : बलभीम लोखंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()