Solapur News : शिवशक्ती बँकेच्या सभासदांनी फुंकले रणशिंग; डॉ. बुरगुटे विरुद्ध जगदाळे यांच्या पॅनेलमध्ये लढत

बॅंकेचे ३ हजार ४४२ सभासद असून शहरात दोन शाखा कार्यरत आहेत.
shivshakti urban co operative bank election vote solapur burgute vs jagdale politics
shivshakti urban co operative bank election vote solapur burgute vs jagdale politicssakal
Updated on

बार्शी : शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आधिपत्याखाली १९९९ मध्ये स्थापन झालेल्या शिवशक्ती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची वेगाने घोडदौड सुरू आहे. बॅंकेच्या संचालक मंडळासाठी पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून विद्यमान संचालकांविरोधात सभासदांनी पॅनेल उभे केल्याने निवडणुकीत रंगत येणार असल्याची चर्चा आहे.

स्थापनेपासून डॉ. प्रकाश बुरगुटे हे या बँकेचे अध्यक्ष आहेत. संचालक मंडळाची मुदत तीन वर्षांपूर्वी संपली होती. पण कोरोनामुळे बँकेला मुदतवाढ मिळाली होती. बॅंकेचे ३ हजार ४४२ सभासद असून शहरात दोन शाखा कार्यरत आहेत.

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता. १३) कर्मवीर परिवार पॅनेल व शिवशक्ती परिवर्तन पॅनेल, अशा दोन्ही पॅनेलचे प्रत्येकी १७ प्रमाणे ३४ अर्ज राहिल्याने निवडणूक अटळ आहे.

कर्मवीर परिवार पॅनेलची धुरा डॉ. प्रकाश बुरगुटे सांभाळत आहेत तर शिवशक्ती परिवर्तन पॅनेलची धुरा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे यांच्याकडे आहे.

दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केली असून प्रत्येक सभासदाच्या घरी जाऊन भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. कर्मवीर परिवार पॅनेलला कपबशी तर शिवशक्ती परिवर्तन पॅनेलला पतंग चिन्ह मिळाले आहे. २४ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वेळेत मतदान आहे.

shivshakti urban co operative bank election vote solapur burgute vs jagdale politics
Solapur News : राष्ट्रीय निशाण नगरपालिकेवर फडकविण्याचा पहिला मान सोलापूरचा

कर्मवीर परिवार पॅनेलचे उमेदवार

डॉ. प्रकाश बुरगुटे, हनुमंत चव्हाण, मुरलीधर चव्हाण, अरुण देबडवार, किसन पवार, प्रफुल्ल गाढवे, राजेंद्र मोरे, सर्जेराव माने, धोंडिराम करंजकर, प्रशांत मोहिरे, सुनील शेटे, मुकुंद वाघ, गोविंद ढाळे, सारंगा बुरगुटे, मीरा यादव, अशोक वाघमारे.

शिवशक्ती परिवर्तन पॅनेलचे उमेदवार

नंदकुमार जगदाळे, सुनील शेळके, भागवत चव्हाण, अशोक कदम, विश्वास देशमुख, मधुकर शेळके, नीलेश मोहिते, लहू आगलावे, उद्धव पाटील, धनंजय धस, प्रशांत आवटे, उमेश गटकळ, विजयश्री पाटील, अनुराधा जगदाळे, भीमा मस्के, शिवाजी हाके, अभिमान ढगे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.