शिवतेजसिंह साठे अन्‌ सावंतांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी माढा तालुक्यातील माजी आमदार धनाजी साठे व शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांची बुधवारी भेट
shivtejsinh mohite patil meet shivaji sawant and dhanaji  sathe over mada lok sabha election
shivtejsinh mohite patil meet shivaji sawant and dhanaji sathe over mada lok sabha election Sakal
Updated on

माढा: माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत मोहिते-पाटील हे यांच्याकडून राजकीय पाठिंबा कितपत मिळतो याची चाचपणी सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे बंधू तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांची वाकाव येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यामध्ये सुमारे एक तासभर चर्चा झाली. काँग्रेसचे माजी आमदार आणि धनाजी साठे यांचीही मित्रप्रेम निवासस्थानी भेट घेऊन शिवतेजसिंह यांनी चर्चा केली.

माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. यावेळी जगदंबा गणेश मंडळाच्यावतीने मोहिते-पाटील यांचा सन्मान करून येत्या लोकसभा निवडणुकीला मोहिते-पाटील कुटुंबीयांनी सामोरे जाण्याची मागणी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केली. नगरसेवक शहाजी साठे यांची देखील मोहिते- पाटील यांनी भेट घेतली.

भाजपकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली असताना त्यांच्या उमेदवारीबाबत मोहिते-पाटील समर्थकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील काही मातब्बर नेतेमंडळींबरोबरच नगरसेवक,

माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्याही भेटीगाठी घेतल्याने माढा लोकसभा मतदारसंघाबाबतचा दावा मोहिते-पाटील कुटुंबाकडून अद्याप सोडला नसल्याचे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात मांडले जात आहेत. यांच्या समवेत माजी शिवाजी कांबळे, नाना लटके व मोहिते समर्थक उपस्थित होते.

मी सध्या सर्व नेते मंडळीच्या सदिच्छा भेटी घेत असून, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हेच निवडणुकीसंदर्भातील जो निर्णय घेतील. त्याप्रमाणे वाटचाल केली जाणार आहे.

- शिवतेजसिंह मोहिते-पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.