Solapur News : सोलापूर शहरात १२ अतिधोकादायक इमारती

पाडकामाला अनेक कारणांचा अडथळा; नागरिकांच्या जीवाला धोका
Solapur News
Solapur Newssakal
Updated on

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत १२ अतिधोकादायक इमारती आहेत. या इमारतींचा धोका या परिसरातील नागरिकांना आहे. या इमारतींच्या पाडकामांना महापालिकेच्या उदासीनतेचा शिवाय प्रकरणे न्याय प्रविष्ट असणे अशा ‘या’ ना ‘त्या’ कारणांचा अडथळा आहे.

दरम्यान, या अतिधोकादायक इमारती सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात जणू काही नागरिकांच्या जिवावर उठणाऱ्या ठरल्या आहेत. महापालिकेच्या बेजबाबदारपणाचा कारभार याला अधिक कारणीभूत असल्याचे मानले जाते.

सोलापूर शहरात पावसाळी वातावरण आहे. गेल्या आठवड्यात शहरात ६७ मि.मी.पाऊस झाला. तथापि, पावसाळ्यातील धोका लक्षात घेता, अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शहरात बारा अतिधोकादायक इमारती असून महापालिकेकडून पाडकामाची कारवाई गतिमान पद्धतीने सुरू असल्याचे सांगण्यात आले. सात इमारती पाडण्यात आल्या आहेत. पाच इमारत न्यायप्रविष्ट असल्याने पाडण्यात अडचणीत आहेत. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली.

शहरात पावसाळ्यात कोणतीही इमारत कोसळून परिणामी कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्त हानी होऊ नये, याबाबतची दक्षता महापालिका प्रशासनाकडून घेतली जाते.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचा शोध घेतला जातो. महापालिकेच्या सर्व्हेक्षणात शहरात विविध प्रकारचा धोका असलेल्या एकूण ११२ इमारती आढळून आल्या. त्यातील ११० मिळकतदारांना नोटिसा देण्यात आल्या.

अतिधोकादायक १२ इमारती आढळून आल्या. त्या १२ इमारती तत्काळ पाडण्याची मोहीम महापालिका प्रशासन हाती घेणार आहे. त्यातील सात इमारतींचे पाडकाम महापालिकेने पूर्ण केले आहे.

Solapur News
Solapur : सर्वर डाऊन मुळे महाऑनलाईनची सेवा ठप्प, विद्यार्थी व बेरोजगारातून संताप

२४ जून रोजी शहरात एका तासात तब्बल ६७ मी. मी. पाऊस पडला. त्यामुळे शहराच्या अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्याभरात पडणारा पाऊस एकाच दिवशी पडला. त्यामुळे महापालिका प्रशासनाची त्रेधातिपट उडाली.

त्यातच शहरातील धोकादायक इमारतींचा धोका लक्षात घेता, शहरात दुसरा पाऊस पडण्याअगोदर त्या इमारती पाडण्यासाठीची मोहीम हाती घेतली जाणार आहे.

Solapur News
Solapur: हे अल्ला! भरपूर पाऊस पाड, सर्वांना सुख-समृद्धी लाभू दे! मुस्लिम समाजाचं अल्लाकडे साकडं

काही ठळक नोंदी

  • शहरातील एकूण धोकादायक इमारती : ११०

  • अतिधोकादायक इमारतींची संख्या : १२

  • जागा रिकामी करून दुरुस्ती करण्याच्या इमारती : ३४ इमारती

  • बांधकाम मजबुतीकरण करून राहण्यायोग्य : ७१ इमारती

  • मिळकतदारांनी दुरुस्ती करून घेतलेल्या इमारती संख्या : १७

  • मालक व भाडेकरी वादातील इमारत : ३६

  • न्यायालयीन वाद असलेल्या इमारतींची संख्या : २१

Solapur News
Solapur : लग्नात जेवण करताना राडा; दगडफेकीत चौघे जखमी; १८ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शहरात अतिधोकादायक असलेल्या आणि तातडीने पाडकाम करण्याची आवश्यकता असलेल्या एकूण बारा इमारती होत्या. त्यापैकी मागील आठ दिवसात सात इमारतींचे पाडकाम पूर्ण केले आहे.

एका इमारतीचा वाद हा न्यायप्रविष्ट असल्याने कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आला. बांधकामाचे स्ट्रक्चर व इतर तांत्रिकबाबी लक्षात घेत, या इमारतींचे वर्गीकरण करण्यात आले होते.

- सारीका अकुलवार, बांधकाम विभाग प्रमुख, सोलापूर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.