कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आषाढी व कार्तिकी यात्रा भरविण्यास शासनाने परवानगी दिली नव्हती. दोन्ही महत्त्वाच्या यात्रा रद्द झाल्यामुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या दोन्ही महत्त्वाच्या यात्रेमुळे पंढरीत दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल होत असते.
पंढरपूर (सोलापूर) : जिल्हा प्रशासनाने सोमवार (ता.७) पासून सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरातील व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने हळू हळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर (Sri Vitthal Rukmini Temple) बंद असल्यामुळे भाविकांनी पंढरीकडे पाठ फिरवल्याने मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांच्या दुकानात मात्र शुकशुकाट जाणवत आहे. कोरोना (Corona) संदर्भातील योग्य त्या खबरदारी घेत शासनाने श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करावे, अशी मागणी या व्यापाराकडून होत आहे. (shopkeepers are worried as sales are not taking place in the pandharpur temple area)
पंढरीतील प्रासादिक वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे अर्थकारण श्री विठ्ठल मंदिरावर अवलंबून आहे. कोरोना महामारीमुळे एक-दोन महिने वगळता मागील मार्चपासून श्री विठ्ठल मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आषाढी व कार्तिकी यात्रा भरविण्यास शासनाने परवानगी दिली नव्हती. दोन्ही महत्त्वाच्या यात्रा रद्द झाल्यामुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या दोन्ही महत्त्वाच्या यात्रेमुळे पंढरीत दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल होत असते.
यंदाच्या आषाढी यात्रेवर देखील कोरोनाचे सावट आहे. अशातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागील दोन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. सोमवारपासून जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, कापड, तयार कपडे, स्टेशनरी आदी दुकानांमधून वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक दिसून येत आहेत. मात्र मंदिर परिसरात फेरफटका मारला असता प्रासादिक वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यापारांच्या दुकानात मात्र ग्राहकांअभावी शुकशुकाट दिसून येत आहे.
कोरोनामुळे मागील वर्षीपासून व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. आमचा अगरबत्ती निर्मितीचा व्यवसाय पूर्णपणे कामगारांवर अवलंबून आहे. अशा अनेक कामगारांचे भवितव्य ही संकटात आले आहे. कोरोनातील सर्व उपाययोजना व खबरदारी घेऊन शासनाने विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करावे अशी आमची मागणी आहे.
- सागर ताठे, अगरबत्ती निर्मिती व्यवसायिक, पंढरपूर
आमचा कुंकू, बुक्का व प्रासादिक साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. मात्र श्री विठ्ठल मंदिर बंद असल्यामुळे भाविकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. शासनाने सोमवारपासून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली तरी भाविकच पंढरीत येत नसल्यामुळे आमच्या दुकानात दिवसभराचा खर्च निघेल एवढीही विक्री होत नाही.
- अनिल गायकवाड, प्रासादिक साहित्याचे व्यापारी, पंढरपूर
(shopkeepers are worried as sales are not taking place in the pandharpur temple area)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.