Shri Khandoba Temple Controversy : ४२ एकर जमीन हडपण्याचा डाव; देवस्थान कमिटीवरचे आरोप निरर्थक, अध्यक्ष विनय ढेपे

किशोर पाटील यांनीच खंडोबा देवस्थानची ४२ एकर जमीन हडप केली असून देवस्थान पंच कमिटीवर निरर्थक आरोप केले
Khandoba
KhandobaSakal
Updated on

सोलापूर : किशोर पाटील यांनीच खंडोबा देवस्थानची ४२ एकर जमीन हडप केली असून देवस्थान पंच कमिटीवर निरर्थक आरोप केले आहेत, असा खुलासा चेअरमन विनय ढेपे यांनी मंगळवारी ( ता.३१) पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

बाळे येथील श्री खंडोबा देवस्थानमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असून चेअरमन विनय ढेपे यांचा मनमानी कारभार सुरू असून श्री खंडोबा देवाचा गाभारा दर्शन कायमस्वरूपी खुले करावे, देवस्थानमध्ये भाविकांसाठी स्नानगृहाची सोय करावी,

लग्न, मुंज आदी विधिवत कार्य चालू करावे, हक्कदार पुजाऱ्यांना विश्वासात न घेता केलेला जमिनीचा व्यवहार रद्द करून काढलेली रक्कम श्री खंडोबा देवस्थानच्या खात्यात जमा करावी, सर्व हक्कदार पुजाऱ्यांना विश्वासात घेऊन कारभार करावा आदी विविध मागण्यांसाठी खंडोबा मंदिर येथे अजिंक्य पुजारी व मानकरी किशोर पाटील यांनी आंदोलन केले होते.

या पार्श्वभूमीवर, श्री ढेपे पुढे म्हणाले की, २८ नोव्हेंबर २०२२ रोजी देवस्थान हक्कदार पुजाऱ्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली होती. यामध्ये २०२३-२४ कालावधीसाठी चे कार्य मंडळाचे कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात आली होती.

यामध्ये चेअरमन विनय ढेपे व सागर पुजारी यांची सचिवपदी निवड झाली होती. यावेळी आंदोलनकर्ते अजिंक्य पुजारी उपस्थित होते. त्यांचीसुद्धा स्वाक्षरी आहे. याच सभेमध्ये देवस्थानकरिता भक्त निवास व वाहनतळासाठी जागा आवश्यक असल्याबाबतची चर्चा करण्यात आली होती. चर्चेनुसारच, जागा खरेदी करण्यात आली आहे.

मूळ गाभाऱ्यातील दर्शन हे सुरक्षेच्या तसेच पवित्र राखण्याच्या हेतूने बंद करण्यात आले आहे असे स्पष्टीकरणदेखील त्यांनी दिले आहे. देवस्थान ठिकाणी होणाऱ्या विवाह कार्यादरम्यान काही गैरप्रकार जसे की, दारूच्या बाटल्या, जुगार खेळणे आधी प्रसंग होत असल्याने लग्न व मुंज बंद करण्याचा निर्णय देवस्थान कमिटीने घेतला आहे, अशी माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.

किशोर पाटील यांनी जागेचा व्यवहार त्यांना न विचारता करण्यात आला म्हणून विनाकारण गैरसमज करून घेऊन त्यांनी त्यांच्या राजकीय वलयाचा फायदा घेऊन हक्कदार पुजाऱ्यापैकी अजिंक्य पुजारी,सिद्धाराम पुजारी व बाळकृष्ण मोकाशी यांना सोबत घेऊन उपोषण व खोट्या तक्रारी दाखल केल्या आहेत असेही श्री.ढेपे म्हणाले.

देवस्थानला सिद्धाराम नान्नजकर यांनी वैयक्तिक मालकीच्या मिळकतीचे उत्पन्न देण्याची व्यवस्था करून त्याची ट्रस्ट केली होती. परंतु, किशोर पाटील यांच्या कुटुंबाने त्या संपूर्ण मिळकती तसेच ट्रस्टवर बेकायदेशीर ताबा केला आहे.

त्याचे कुठलेही लेखा परीक्षण केले नाही. त्या सर्व ४२ एकर जमिनीचे उत्पन्न बऱ्याच वर्षापासून ते घेत आलेले आहेत. त्याबाबत धर्मादाय कोर्टामध्ये प्रकरण दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळेच त्यांचे धाबे दणाणले असल्यामुळे देवस्थानच्या पंच कमिटीला बदनाम करण्याचे काम किशोर पाटील सर्व हक्कदार पुजाऱ्याना घेऊन करत आहेत असेही शेवटी श्री ढेपे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस आदिनाथ पुजारी, दशरथ पुजारी, कलेश्वर पुजारी,बंडोपंत ढेपे आदी उपस्थित होते.

ती जमीन सोडवून घेतली : किशोर पाटील

श्री खंडोबा देवस्थानात गोरगरिबांची लग्न थांबविणे चुकीचे आहे. त्यामुळे ती पुन्हा सुरू करावीत अशी आमची भावना आहे. दरम्यान १९२८ पासून ४२ एकर जमीन कुळाखाली होती. ती जमीन आम्ही सोडवून घेतली. १९६० मध्ये जमीन सोडवून घेतली आहे. ऑडिटही केले आहेत. ते सादर ही झाले आहेत. सर्व कायदेशीर आहे. कोणताही स्वार्थ नाही. या जागेवर शाळा, हॉस्पिटल वगैरे आम्ही बांधणार असल्याची प्रतिक्रिया मानकरी किशोर पाटील यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()