Ashadhi Wari : तुकोबांच्या सोहळ्याचे आज जिल्ह्यात आगमन

‘सकाळ’तर्फे तुळशीची रोपे देऊन स्वागत
Shri Sant Tukaram Maharaj Palkhi ceremony arrives in Solapur district today
Shri Sant Tukaram Maharaj Palkhi ceremony arrives in Solapur district today
Updated on

श्रीपूर - श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मंगळवारी (ता. ५) सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. जिल्हा सरहद्दीवर ‘सकाळ’च्या वतीने या सोहळ्याचे तुळशीची रोपे देऊन स्वागत करण्यात येणार आहे. मंगळवारी सराटी (ता. इंदापूर) येथील नीरा नदीवरील पूल ओलांडून या सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, मराठा सेवा संघ यांच्यासह विविध संस्था, संघटनांच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात येणार आहे.

जिल्हा हद्दीत त्यासाठी शामियाना उभारण्यात आला आहे. या ठिकाणी प्रशासनाच्यावतीने सोहळ्याचे स्वागत होणार आहे. तत्पूर्वी, हा सोहळा पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करीत असताना निरा नदीवरील पूल प्रारंभाच्या ठिकाणी ''सकाळ''च्या वतीने या सोहळ्याचे स्वागत करण्यात येणार आहे. सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुळशीची रोपे देऊन ''सकाळ''च्या वतीने हे स्वागत करण्यात येणार आहे. याशिवाय या सोहळ्यात रथापुढे व रथामागे चालणाऱ्या सर्व दिंड्यांचे देखील ''सकाळ''च्या वतीने तुळशीची रोपे देऊन स्वागत करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष हा सोहळा निघाला नव्हता. त्यामुळे यावर्षीच्या सोहळ्याला उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दोन वर्षे हा सोहळा निघाला नसल्यामुळे तुळशीची रोपे देऊन स्वागत करण्याची परंपरा देखील खंडित झाली होती. यावर्षीच्या सोहळ्याने ती पुन्हा सुरू होत आहे. गेल्या काही वर्षात ''सकाळ''च्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. या रोपट्यांचे आता वृक्षात रूपांतर झाले आहे. पालखी सोहळ्याच्या आगमनाच्या निमित्ताने बुधवारी (ता. ६) या झाडांचे वाढदिवस साजरे करण्यात येणार आहेत.

''सकाळ'' माध्यम समूहाने तुकोबांच्या पालखी मार्गावर श्रीपूर, बोरगाव, माळखांबी येथील ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण केले आहे. त्यामुळे, या गावांमधील ओढ्यांमध्ये मुबलक जलसंचय झाला आहे. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या हस्ते येथे जलपूजन केले जाणार आहे. या सोहळ्याचे तालुक्यात अकलूज आणि बोरगाव येथे मुक्काम असतात.

सोहळ्याच्या स्वागताची अकलूज नगरपंचायत व बोरगाव ग्रामपंचायतीने जोरदार तयारी केली आहे माळीनगर कारखाना, श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना, दि ब्रिमासागर महाराष्ट्र डिस्टिलरी यांच्या वतीने ही या सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.