'तो' व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

shrikant deshmukh bjp solapur district  president resigns after obscene video clip went viral
shrikant deshmukh bjp solapur district president resigns after obscene video clip went viral
Updated on

सोलापूर : भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले होते. दरम्यान पक्षाने श्रीकांत देशमुख यांना तात्काळ राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याने त्यांनी आपले पद सोडल्याचे बोलले जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. (shrikant deshmukh bjp solapur district president resigns after obscene video clip went viral)

भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा: एक वादग्रस्त व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, महाराष्ट्राचे सोलापूरचे भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

shrikant deshmukh bjp solapur district  president resigns after obscene video clip went viral
युपीत चौकात लागले #ByeByeModi पोस्टर; 5 जण अटकेत

भाजपा सोलापूर (ग्रामीण) माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्या संदर्भातला व्हिडीओ समोर आला आहे, यातील जी संबंधीत ताई आहे तिने तात्काळ पोलिसात तक्रार द्यावी योग्य कारवाई होईलचं. प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ दखल घेत त्यांना पदावरून मुक्त केलेलं आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

shrikant deshmukh bjp solapur district  president resigns after obscene video clip went viral
जयंत पाटील अन् अजित पवारांनी एकत्र दौरा काढला तर, सुप्रिया सुळेंचं सूचक विधान

व्हिडीओमध्ये काय आहे?

काही दिवसांपूर्वी श्रीकांत देशमुख यांनी मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात हनीट्रॅपमध्ये अडकल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान व्हायरल झालेल्या त्यांच्या कथित व्हिडिओमध्ये देशमुख बेडरूममध्ये एका महिलेसोबत दिसत आहेत. देशमुख यांच्यासोबत बेडरूममध्ये दिसलेल्या महिलेचे त्यांच्याशी काय नाते आहे, हे समजू शकले नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित महिला आपला मोबाईल कॅमेरा देशमुख यांच्याकडे दाखवत आहे. देशमुख पलंगावर बसले आहेत. तर महिला मोबाईल कॅमेऱ्यासमोर येऊन देशमुख यांचे नाव घेते आणि त्यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करते.

हे ऐकून देशमुखही अंथरुणातून बाहेर आले आणि महिलेचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताना ऐकू आले. त्यानंतर कॅमेरा बंद होतो. काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी या महिलेविरुद्ध मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात हनीट्रॅपची तक्रार दाखल केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()