करमाळा शहरातील बांधकाम व्यावसायिक श्रीकांत गणपत रच्चा ऊर्फ बाबूशेठ यांचा मंगळवारी (ता. 21) राहत्या घरी गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
करमाळा (सोलापूर) : करमाळा (Karmala) शहरातील मेन रोडवरील कापड दुकानचे मालक व बांधकाम व्यावसायिक श्रीकांत गणपत रच्चा (Shrikant Rachcha) ऊर्फ बाबूशेठ (Babusheth) (वय 59) यांचा मंगळवारी (ता. 21) राहत्या घरी गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह (Crime) आढळला. भर दुपारी ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसात (Karmala Police) अकस्मात मृत्यू अशी नोंद घेण्यात आली असून, हा खून की आत्महत्या? याबाबत लवकरच माहिती दिली जाईल ,असे पोलिसांनी सांगितले.
बाबूशेठ रच्चा हे सुरवातीला शहरातील राजकारणात होते. ते जगताप समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी सुरवातीला प्लॉट घेणे- विकण्याचा व्यवसाय करायचे. तसेच मेन रोडवर साडीचे दुकान टाकले. पुढे त्यांनी प्लॉट तयार करून रो हाऊस विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. पण ते आर्थिकदृष्ट्या अडचणीत होते. मंगळवारी त्यांचा एकुलता एक मुलगा खरेदीसाठी सोलापूरला गेला होता. मुलीचे लग्न झाले आहे. पत्नी आजारी असल्याने बाबूशेठ यांनी त्यांना गावात सोडले होते. त्यांचे घर सिंचननगर परिसरात आहे. दुपारी बाराच्या दरम्यान ते घरी होते. त्यांनी कामगाराला बागवान नगरमध्ये जायचे म्हणून फोनवरून बोलावून घेतले. कामगार त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर गेला असता, दारातच फरशी कट करायच्या कटरने बाबूशेठचा गळा कापल्याचे दिसले. बाबूशेठ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसल्यावर कामगाराने इतरांना बोलावून घेतले. ते मरण पावल्याची खात्री पटल्यावर पोलिसात माहिती देण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. नेमका खून की आत्महत्या? हे तपासांती समजेल. दुपारी मृतदेह मिळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गळा चिरलेल्या अवस्थेत मतृदेह आढळून आल्याने हा खून की आत्महत्या, याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. बाबूशेठ यांच्या घरातील इतर सर्व बाहेरगावी गेलेले होते, तर कामगार काही कामानिमित्त त्यांना शोधत घराकडे गेला. त्या वेळी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बाबूशेठ दिसले. करमाळा पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.