नातेपुते (सोलापूर) : शिंदेवाडी ता. माळशिरस येथील शुभम पांडुरंग जाधव याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत यश मिळवले असून त्यांची 445 रँक आहे.
शुभम पांडुरंग जाधव हा शेतकरी कुटुंबातील तरुण असून त्याचा जन्म 1995 साली झाला आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण शिंदेवाडी व माळीनगर ता. माळशिरस येथे झाले आहे. इयत्ता अकरावी व बारावी हडपसर येथील साधना महाविद्यालयात झाले. पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमधून अर्थशास्त्रांची पदवी घेतली आहे. इंदिरा गांधी ओपन यूनिवर्सिटी मधून राज्यशास्त्र विषयात एम ए केले आहे. तो नेट परीक्षा उत्तीर्ण आहे.
पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी व युनिक अकॅडमीचे त्याला विशेष मार्गदर्शन लाभले आहे. आईवडिलांच्या बरोबरच शुभमला त्याचा आतेभाऊ अमोल क्षीरसागर यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.
त्यांचा हा पाचवा प्रयत्न व चौथी मुलाखत होती. तो त्याच्या आयुष्यात स्वामी विवेकानंद, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व युवकमित्र बंडातात्या कराडकर यांना आदर्श मानतो. त्यांचे आजोबा वै. बाबुराव जाधव हे कीर्तनकार व पैलवान होते. त्यांच्या कुटुंबास वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. प्रशासकीय सेवेत जायचे हे त्याचे शालेय जीवनापासूनचे ध्येय होते. शुभमच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.