होस्पेटच्या पुढे गेल्यानंतर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला समोरून जोरात धडक दिली. त्यामध्ये ट्रकच्या खाली कार अडकली व ट्रकने कारला दूरवर फरफटत नेले.
सोलापूर : कर्नाटकातील होस्पेट (जि. बेल्लारी) जवळील दोट्टीहाळ गावाजवळ भरधाव ट्रकने कारला जोरात धडक दिली. या अपघातात (Solapur Accident) सहाजण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये लवंगी (ता. दक्षिण सोलापूर) येथून बंगळूरकडे कारमधून निघालेले पती-पत्नी व त्यांची दोन चिमुकली मुले, अशा चौघांसह राघवेंद्र यांच्या दोन नातलगांचा देखील मृत्यू झाला आहे.
रविवारी (ता. २८) रात्री झालेल्या या भीषण अपघातात राघवेंद्र सुभाष कांबळे (वय २५), जानू राघवेंद्र कांबळे (वय २३), राकेश राघवेंद्र कांबळे (वय ५) व रश्मिका राघवेंद्र कांबळे (वय २) यांचा मृत्यू झाला आहे. तर मयत राघवेंद्र यांची बहीण कोमल हिच्या इंडी तालुक्यातील नंद्राळ गावच्या दोघा नातेवाइकांचाही अपघातात मृत्यू झाला आहे.
संतोष व खाजू अशी त्यांची नावे आहेत. राघवेंद्र हे १५ दिवसांपूर्वी लवंगी या आपल्या गावी यल्लमा देवीच्या यात्रेसाठी आले होते. बंगळूर येथील एका खासगी कंपनीत ते नोकरीस होते. रविवारी ते कुटुंबासह पुन्हा बंगळूर येथे कारमधून दोन मुले व पत्नीसह निघाले होते. नंद्राळ (ता. इंडी) येथील बहिणीच्या नातेवाइकांना घेऊन ते पुढील प्रवासासाठी निघाले. पण, काळ त्यांची वाट पाहत होता.
होस्पेटच्या पुढे गेल्यानंतर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला समोरून जोरात धडक दिली. त्यामध्ये ट्रकच्या खाली कार अडकली व ट्रकने कारला दूरवर फरफटत नेले. या भीषण अपघातात कारमधील सहाजणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातातील मयत राघवेंद्र हे सुभाष व आई इंदुमती यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांना तीन विवाहित बहिणी आहेत. राघवेंद्रसह त्यांची पत्नी व दोन चिमुकल्या मुलांचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला. राघवेंद्रचे अख्खे कुटुंब काळाने हिरावले आणि त्याच्या आई-वडिलांचा आधार देखील क्षणात जग सोडून गेला. या घटनेने लवंगी व नंद्राळ या गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, यल्लम्मा... यल्लम्मा... नाऊ यान पाप माडीदाऊ... नमग हिंतादू परिस्थिती तरलक...' असा जोराजोरात पुकारा करत आक्रोश करणारी आई... भीमा नदीकाठी एकाच चितेवर जळणारे चौघांचे मृतदेह... अन् 'देवी यल्लम्मा माझा राघू, जानू, राकेश, रश्मिका मला दे गं...' अशी मागणी करत टाहो फोडणारे कुटुंबीय पाहून अख्खं लवंगी (ता. दक्षिण सोलापूर) गावच दुःखाच्या सागरात बुडाले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.