Manarega: मंगळवेढ्यातील अल्पभूधारक शेतकरी मनरेगा लाभांपासून वंचित

Mangavedha : क वर्ग असलेल्या नगरपालिकेत ही योजना राबविण्याबाबत 3 मार्च 2014 या शासन निर्णयानुसार निर्णय घेतला असताना देखील अद्याप नगरपालिका हद्दीत ही योजना राबवली जात नाही.
Manarega: मंगळवेढ्यातील अल्पभूधारक शेतकरी मनरेगा लाभांपासून वंचित
Updated on

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विहिरीचा लाभ नगरपालिका हद्दीतील शेतकऱ्याला मिळत नसल्यामुळे केंद्राच्या महत्त्वाकांशी योजनेपासून शहरातील अल्पभूधारक शेतकय्रावर वंचित राहण्याची वेळ आली.

सध्या नगरपालिकेवर प्रशासकराज आहे त्यामुळे नागरिकांना भेडसावणारे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी प्रशासकावर आहे मात्र सध्या नागरिकांना त्यांच्या अनेक प्रश्नांसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र आहे.

Manarega: मंगळवेढ्यातील अल्पभूधारक शेतकरी मनरेगा लाभांपासून वंचित
Maharashtra Politics: महाराष्ट्रातील जागावाटपाचा तिढा अद्याप संपेना; आणखी आठ-दहा दिवस लागण्याची शक्यता

त्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील 18 ते 59 वयातील नोंदणीकृत मजुरांना या योजनेतून रोजगार निर्मिती व स्थावर मालमत्ता निर्मिती केली जाते त्यामध्ये विहीर, फळबाग, शौचालय, नाफेड खड्डे, घरकुल,गांडूळखत, रेशीम उद्योग यासह अनेक योजनेचा लाभ यातून मिळतो यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतच्या माध्यमातून ही या योजनेचा लाभ दिला जात आहे.

मात्र नगरपालिका कार्यक्षेत्रातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळे शासनाची महत्त्वकांशी योजना शहरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मात्र कागदावर राबवली जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. यासाठी क वर्ग असलेल्या नगरपालिकेत ही योजना राबविण्याबाबत 3 मार्च 2014 या शासन निर्णयानुसार निर्णय घेतला असताना देखील अद्याप नगरपालिका हद्दीत ही योजना राबवली जात नाही.

Manarega: मंगळवेढ्यातील अल्पभूधारक शेतकरी मनरेगा लाभांपासून वंचित
Maharashtra Politics: महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला! कोणत्या पक्षाला किती मिळणार जागा?

पुन्हा 11 मार्च 2021 परिपत्रकही काढले. मात्र ही योजना राबविण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला नसल्याने नगरपालिका हद्दीतील अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना विहिरीच्या लाभांपासून वंचित आहेत. आमदार समाधान आवताडे यांचे स्वीय सहायक रावसाहेब फटे यांनी जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या स्वीय सहायकाच्या बैठकीत याबाबतची मागणी करून देखील जिल्हा प्रशासनाने देखील याकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केले.

ग्रामपंचायत हद्दीत राबवली जाणारी मनरेगाची योजना नगरपालिका हद्दीत राबवण्यासाठी प्रशासन का चालढकल करत आहे .प्रशासनाच्या चालढकलीमुळे माझी 3.25 एकर इतकी अल्पभूधारक जमीन असताना या योजनेतून विहीरीचा लाभ मिळत नाही.

सुभाष माळी,शेतकरी, मंगळवेढा

Manarega: मंगळवेढ्यातील अल्पभूधारक शेतकरी मनरेगा लाभांपासून वंचित
Maharashtra News: अधिकांश राज्य होणार दुष्काळसदृश! मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.