'मंदिर समितीने लाडू प्रसाद पुरवठा करणाऱ्या २०२१-२२ मधील नाशिक येथील संस्थेला आर्थिक संबंधांच्या आधारे त्यांचे निकृष्ट लाडूकडे दुर्लक्ष केले व लाखो भक्तांची फसवणूक केली.'
पंढरपूर : पंढरपूर येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती (Vitthal- Rukmini Temple Committee Pandharpur) बरखास्त करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत नवीन मंदिर समिती नियुक्त करावी, अन्यथा मंदिरासमोर धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अॅड. दत्तात्रय खडतरे यांनी दिला आहे. या संदर्भात विधी व न्याय विभागाला लेखी निवेदन दिले आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या समितीची मुदत संपलेली आहे. तरीही गेल्या अनेक वर्षांपासून नवीन समिती नियुक्त केली नाही. या संदर्भात खडतरे यांनी लेखी निवेदन दिले आहे. मंदिर समितीने लाडू प्रसाद पुरवठा करणाऱ्या २०२१-२२ मधील नाशिक येथील संस्थेला आर्थिक संबंधांच्या आधारे त्यांचे निकृष्ट लाडूकडे दुर्लक्ष केले व लाखो भक्तांची फसवणूक केली.
गोशाळा विभागाचे कोणतेही नियोजन नाही, भक्तनिवास बंद पाडले आहे. त्याचा महिन्याला दहा लाख इतका तोटा गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. विठ्ठल- रुक्मिणी मंदिराला भाविकांनी दान केलेल्या प्राचीन मौल्यवान ३१५ प्रकारच्या दागिन्यांची नोंद घेतली नाही, अशा अनेक तक्रारी त्यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.
विविध टेंडर प्रक्रियेमध्ये नेहमी फेरफार केली जाते. स्वतःच्या पदाचा वापर केवळ स्वतःच्या मर्जीतील लोकांना देवाचे दर्शन देण्यासाठी व स्वतःच्या मठाचा विकास करण्यासाठी केला आहे. भाविकांनी दान केलेले सोने हे पितळ भासविण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी आपल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे ही मंदिर समिती बरखास्त करावी व यातील सदस्यांची फेरनियुक्ती करू नये, अशी मागणी खडतरे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.