सोलापूर : जिल्ह्यातील दोन लाख 19 हजार 400 व्यक्तींना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी दोन लाख 13 हजार 960 रुग्णांनी कोरोनावर मात केली. परंतु, पाच हजार 221 रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. त्यात सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांचाच बळी गेला. प्रतिबंधित लसीकरणामुळे रुग्णालयात दाखल रुग्ण तिसऱ्या लाटेत खूपच कमी राहिले. त्यामुळे त्यांना रेमडेसिवीर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज लागली नाही.
कोरोनाच्या दोन्ही लाटांच्या तुलने तिसरी लाट सौम्य राहिली. बाधितांची संख्या अधिक असतानाही रुग्णालयात दाखल रुग्ण या लाटेत खूपच कमी राहिले. ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर, टॉसिलुझुमाब अशा इंजेक्शनचीही गरज खूपच कमी होती. आता तिसरी लाट ओसरू लागली आहे. शुक्रवारी (ता. 18) सोलापूर शहरात तीन तर ग्रामीणमध्ये 26 नवीन रुग्ण वाढले. मळोळी (ता. माळशिरस) येथील 93 वर्षीय आजोबांची कोरोनाविरुध्दची झुंज अपयशी ठरली. आतापर्यंत ग्रामीणमधील एक लाख 85 हजार 785 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. त्यातील एक लाख 81 हजार 878 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 189 सक्रिय रुग्ण आहेत. दुसरीकडे शहरातील 33 हजार 615 कोरोना बाधितांपैकी 32 हजार 82 रुग्ण कोरोनातून बरे झाले. सद्यस्थितीत शहरात अवघे 30 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत शहरातील एक हजार 503 तर ग्रामीणमधील तीन हजार 718 रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनावरील प्रतिबंधित लसीमुळे या लाटेची तीव्रता फार दिसली नाही. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने त्यांना घरी उपचार घेण्यास परवनागी मिळाली. त्यामुळे मोठी आर्थिक बचत झाली. नागरिकांनी प्रतिबंधित लस टोचून घेतली, मास्क, स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याने दोन्ही लाटांच्या तुलनेत तिसरी लाट धोकादायक ठरली नाही. अजूनही धोका पूर्णपणे टळला नसल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
कोरोनाची स्थिती...
एकूण बाधित
2,19,400
कोरोनामुक्त
2,13,960
कोरोनामुळे मृत्यू
5,221
सक्रिय रुग्ण
219
जिल्ह्यात लागले 200 रेमडेसिवीर
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेत अत्यवस्थ रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन टोचण्यासाठी मेडिकल्स बाहेर लांबलचक रांगा पहायला मिळाल्या. एका रुग्णाला किमान तीन-चार इंजेक्शनची गरज लागली. रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यानंतर रुग्ण खात्रीशिरपणे बरा होतो, असा त्यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना विश्वास होता. परंतु, कोवॅक्सिन, कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढली आणि त्या इंजेक्शनची तिसऱ्या लाटेत फार गरज लागली नाही. खासगी मेडिकल्समधून (होलेसल विक्रेते) तिसऱ्या लाटेत (जानेवारीपासून) जवळपास दोनशे रेमडेसिवीर इंजेक्शन विकल्याची माहिती औषध प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.