Latest Maharashtra News: तुळजापूर होऊन देवीची ज्योत घेऊन येताना वेगातील पिकअप पलटी होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर 19 जण जखमी झाल्याची घटना मंगळवेढा सोलापूर महामार्गावर कामती खुर्द गावाजवळ घडली. या घटनेने ऐन घटस्थापनेच्या दिवशी गोणेवाडी गावावर शोककळा पसरली
यासंदर्भात प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील बागडेबाबा नवरात्र महोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तुळजापूरहून देवीची ज्योत घेऊन गावाकडे परतत असताना नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर कामती खु गावाजवळ स.6.30 ते 7 च्या दरम्यान आली असता भरधाव वेगातील पिकअप चालकाने अचानक ब्रेक दाबल्यानंतर सदरचे पिकअप कठड्यावरून पलटी होऊन रस्त्यालगत असलेल्या सिमेंटच्या गटारीत पडले.
यामध्ये प्रदीप क्षीरसागर व नेताजी कराळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये महेश बंडगर, वैभव हजारे, सोचल मुलाणी, रोहित माने, रोहित कसबे, समाधान मासाळ, किरण हजारे, दादा लोखंडे,राजू होरे, सुहास मासाळ, समाधान तरटे,सौरभ क्षीरसागर, अभिजीत कसबे, दयानंद बंडगर, आप्पासाहेब मासाळ,सागर मलपे, विश्वजीत मासाळ, अक्षय कांबळे, संतोष मोहिते, हे जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ यांनी घटनास्थळी त्यांना माहिती मिळतात तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन किरकोळ जखमींना मंगळवेढा येथील खाजगी रुग्णालयात तर गंभीर जखमींना सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताचे वृत्त समजतात गोणेवाडी ग्रामस्थांनी सध्या सोलापूरकडे धाव घेतली आहे नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने दुचाकीच्या पुंगळ्या काढून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.