Solapur: कुत्रे आडवे आल्याने अपघात; पती-पत्नीचा मृत्यू!

Accident News: शेगाव दुमाला ता पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे सांगितले.
Solapur Accident New
Solapuresakal
Updated on

Mohol Accident News: मोटार सायकलला कुत्रे आडवे येऊन झालेल्या अपघातात टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगाराचा व त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. हा अपघात रविवार ता 20 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोहोळ ते पंढरपूर पालखी मार्गावर देगाव हद्दीत झाला. महादेव रामचंद्र गुंड वय 65 व आशाबाई महादेव गुंड वय 55 दोघेही रा मगरवाडी अशी मृत पती व पत्नीचे नाव आहे.

पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, महादेव गुंड व आशाबाई गुंड हे मूळचे कोन्हेरी ता मोहोळ चे रहिवासी आहेत. महादेव गुंड हे टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यातील रसायन विभागात ज्यूस सुपरवायझर या पदावर कार्यरत होते. सध्या ते मगरवाडी ता पंढरपूर येथे राहण्यासाठी गेले होते. रविवारी सायंकाळी पाच वाजता दोघे पती-पत्नी शाईन मोटरसायकल नंबर एम एच 13 सीसी 6217 वरून दिपवाळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी पंढरपूर कडे निघाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.