Deer : सोलापुरातील हरिण ‘सह्याद्री’त रुळले

अतिरिक्त ७७ प्राण्यांपैकी चार हरणांचा सह्याद्री टायगर रिझर्व्हमध्ये मुक्त विहार
deer
deersakal
Updated on

सोलापूर : सोलापूरच्या प्राणी संग्रहालयातील अतिरिक्त मगर, सांबर, काळवीट, चितळ या प्राण्यांपैकी हरणांना ‘सह्याद्री टायगर रिझर्व्ह’कडे हलविण्यात आले. पहिल्या टप्प्यात गेलेले चारही हरिण आता सह्याद्रीमधील निसर्गामध्ये रुळले आहेत. हे हरिण सुखरूप असल्याचा अहवाल महापालिका प्राणी संग्रहालयाला मिळाला आहे.

सोलापूर शहरालगत २०० किलोमीटर परिसराच्या परिघात एकही प्राणी संग्रहालय नाही. सोलापूर शहरातील प्राणी संग्रहालय ‘स्मॉल कॅटेगरी’मध्ये मोडते. त्यामुळे प्राण्यांच्या संख्येवर मर्यादा आहेत. चितळ आणि मगरींची संख्या वाढली असल्याने अतिरिक्त प्राणी सह्याद्री, ताडोबा नगरीत जाण्याच्या तयारीत होते. २९ सप्टेंबर २०२२ रोजी ७७ अतिरिक्त प्राण्यांपैकी चार हरणांची रवानगी ‘सह्याद्री टायगर रिझर्व्ह’कडे करण्यात आली.

महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाची मान्यता कायम ठेवण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. दरम्यान, अतिरिक्त प्राण्यांसाठी नागपूर चिडियाघर प्राधिकरणाकडून सह्याद्री, ताडोबा, गोरेगाव आदी ठिकाणे निश्चित केली आहेत. प्राण्यांना हस्तांतरण करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे.

प्राण्यांची वैद्यकीय तपासणी, झोपण्याच्या वेळा आदी बाबी लक्षात घेऊन तसेच प्राण्यांना हस्तांतरित करताना आवश्यक असलेले नैसर्गिक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान, सह्याद्रीच्या पाच जणांचे पथक गोपनीयता बाळगत महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील चार हरिण घेऊन गेले. पहिल्या टप्प्यातील हरणांची हस्तांतरणाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. आता सोलापुरातील हरिण सह्याद्रीच्या निसर्गात मुक्त झाले आहेत. हरिण सुखरूप असल्याचा अहवालही सह्याद्रीकडून महापालिका प्राणी संग्रहालयाला मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.