Mangalvedha: माझी लढाई भाजपच्या शेतकरी, कष्टकरी ,गोरगरिबाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेविरोधात व महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी आहे मात्र या मतदारसंघात उचल गॅंग तयार झाली असून त्यांनी माझ्याबद्दल व कुटुंबियाबद्दल चुकीची माहिती वरिष्ठांना देत दिशाभूल केली.पंढरपूरात योग्य तोडगा न काढल्यास मोहोळ आणि माढ्याबाबत जे काही घडेल त्यावेळी माझा देखील नाईलाज होईल असा सुचक इशारा काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांनी दिला.
त्यांचा प्रचाराचा शुभारंभ आज माचनूर येथे खा. प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी माजी आमदार दिलीप माने,शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष अॅड नंदकुमार पवार,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, समाधान फाटे, अँड राहुल घुले, पांडुरंग चौगुले, दामाजीचे उपाध्यक्ष तानाजी खरात संचालक मुरलीधर दत्तू किरणराज घाडगे, जयश्री भालके, डॉ.प्रणिता भालके काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, रणजीत बागल, संदीप बुरकूल,मनोज माळी,नितीन पाटील, गुलाब थोरबोले, धनाजी बिचुकले, अनिल पाटील,दौलत माने, श्रीकांत पवार यांच्यासह दोन्ही तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना भगीरथ भालके म्हणाले की, माझी लढाई सर्वसामान्य जनतेसाठी आहे.