मोहोळ - येथील मुलींच्या शासकीय वसतीगृहाचे कोविड कालावधीतील थकीत विजबील उत्तरदायीत्व फंडातून चिंचोली औद्योगिक वसाहतीतील दोन कंपन्यांनी भरल्याने महसुल व आरोग्य प्रशासनाला दिलासा मिळाल्याची माहिती प्रभारी तहसीलदार भालचंद्र यादव यांनी दिली
या संदर्भात माहिती देताना तहसीलदार यादव म्हणाले,
सन 2020 ते सन 2022 या कालावधीत जगभर कोविड ची साथ मोठया प्रमाणात होती. कोविड साथीची तीव्रता मोठया प्रमाणात असल्याने सर्व रुग्णांना रुग्णसेवा पुरविण्या कामी मोहोळच्या महसुल व आरोग्य प्रशासना समोर मोठे आवाहन निर्माण झाले होते. सदर कालावधी मध्ये मोहोळ तालुक्यात कोविड चे रुग्ण मोठया प्रमाणात आढळून आले होते.
या रुग्णा वरील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशा नुसार मोहोळ शहरातील मुलींच्या शासकीय वस्तीगृहाच्या नुतन इमारतीत कोविड सेंटर उभारण्यात आले होते. या कोविड सेंटर मध्ये बाधीत रुग्णांवर अत्याधुनिक उपकरणा व्दारे उपचार करण्यात येऊन, अनेक कोविड रुग्णाना जीवदान देण्यात तालुका प्रशासनाला यश आले होते
.या कालावधीत विद्युत पुरवठया बाबतचे विजबिल मिटर रिडींग घेता आले नव्हते. तथापी कोविड साथ ओसरल्या नंतर मुलींच्या शासकीय वस्तीगृह इमारतीमध्ये वापरण्यात आलेले विजबील रु. 1 लाख 03 हजार 370 रुपये इतकी रक्कम थकीत होती.या थकीत बीलामुळे महावितरणने सदर वस्तीगृहाचा विद्युत पुरवठा खंडीत केला होता. त्यामुळे सन 2022 ते 2023 या कालावधीत विज बील भरणा करण्यात न आल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता, त्यामुळे या वस्तीगृहाचा ताबा देण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
दरम्यान महसुल प्रशासना कडून चिंचोली-काटी औघोगीक वसाहतीतील बालाजी अमाईन्स व लक्ष्मी हायड्रोलीक प्रा. लिमीटेड या कंपन्याना आवाहन करुन उत्तरदायित्व फंडातुन वीज बील भरण्यासाठी रक्कम मागणी करण्यात आलेली होती. तहसीलदार यादव व सावळेश्वरचे मंडलाधिकारी प्रकाश दळवे यांच्या विनंतीला मान देवून बालाजी आमईन्स व लक्ष्मी हायड्रोलिक प्रा.लि. यांनी प्रत्येकी रु. 25 हजार रुपया प्रमाणे 50 हजार रुपयांचे थकीत विज बीलभरणा केला.
दोन वर्षापासून प्रलंबित असलेला थकीत वीज बीलाचा प्रश्न महसुल प्रशासनाच्या माध्यमातुन व दोन नामवंत कंपन्यांच्या उत्तरदायित्व फंडातून विद्युत महावितरणला धनादेश देण्यात आला. उर्वरीत 53 हजार 370 रुपयांचीही व्यवस्था येत्या आठवडया करण्यात येणार असल्याचे तहसीलदार यादव यांनी सांगीतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.