Solapur : भाजपकडून लोकसभेसाठी शोध उमेदवाराचा; सुशीलकुमारांच्या विरोधात शड्डू ठोकायला लावण्याचा !

सलग दोनवेळा मानहानीकारक पराभव पचवूनदेखील सुशीलकुमारांनी पुन्हा लोकसभेच्या आखाड्यात शड्डू ठोकण्याची मानसिकता केलेली आहे.
Sushil Kumar Shinde
Sushil Kumar Shindesakal
Updated on

- शिवाजी भोसले

लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. देशाच्या पटलावर आजवर चर्चेत राहिलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातदेखील खासदारकीच्या निवडणुकीचे नगारे वाजू लागलेत. काँग्रेसचे बडे प्रस्थ तथा राष्ट्रीय नेते सुशीलकुमार शिंदे यांना लोकसभेच्या आखाड्यात पुन्हा उतरविण्याचा निर्णय झाल्यानंतर भाजपच्या गोटात उमेदवारीवरून चाचपणी सुरू आहे.

श्री. शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि तगड्या उमेदवाराला फाइटदेणारा तितकाच सक्षम चेहरा भाजपकडून शोधला जाऊ लागला आहे. राखीव प्रवर्गातला सामर्थ्यवान मतदारसंघामधील भूमिपुत्र चेहरा अद्याप तरी भाजपच्या नजरेसमोर नसल्याची वस्तुःस्थिती असल्याचे या पक्षातील गोटातून सांगण्यात आले.

तरीपण सुशीलकुमारांसारख्या ‘ऊर्जा’वान चेहऱ्याच्या विरोधात पक्षाच्या उमेदवाराला इथल्या लोकसभेच्या महासंग्रामात शड्डू ठोकायला लाऊन श्री. शिंदे यांना पराभवाची पुन्हा एकदा धूळ चारत भाजपची विजयाची पताका रोवण्याची रणनीती या पक्षाकडून आखली जात आहे.

Sushil Kumar Shinde
Mumbai : पावसाळ्यात मध्य रेल्वेचे देशी जुगाड! हार्बर रेल्वे स्थानकांना बांबूच्या मंडपाचा आधार

देशाचे माजी गृहमंत्री तथा काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, सोनिया गांधी यांचे अत्यंत विश्‍वासू. इतकेच काय तर सर्वसाधारण जागेवरून आरक्षीत चेहरा निवडून येणे यामुळे देशाच्या पटलावर आजवर ओळख राहिलेल्या सुशीलकुमारांबरोबरच जातप्रमाणपत्रामुळे चर्चेत राहिलेल्या विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघ तसा नेहमीच लक्ष्यवेधी राहिलेला. हाच मतदारसंघ सुशीलकुमारांची पुन्हा उमेदवारी आणि भाजपचा उमेदवार कोण? यामुळे लक्ष्यवेधी होऊ लागला आहे.

सलग दोनवेळा मानहानीकारक पराभव पचवूनदेखील सुशीलकुमारांनी पुन्हा लोकसभेच्या आखाड्यात शड्डू ठोकण्याची मानसिकता केलेली आहे. शिवाय काँग्रेस पक्षाकडेदेखील श्री. शिंदे यांच्या एवढा सोलापूर लोकसभेसाठी सक्षम चेहरा नाही.

त्यामुळे काँग्रेस, सुशीलकुमार आणि सोलापूर लोकसभा हे समीकरण या खेपेस पुन्हा एकदा जुळलेले दिसणार. शिवाय या पार्श्वभूमीवर, काँग्रेसची पर्यायाने सुशीलकुमार आणि त्यांच्या राजकीय वारस कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून लोकसभेची तयारीदेखील सुरू झालेली आहे.

Sushil Kumar Shinde
Mumbai : दक्षिण मुंबईतील ४ झोपडपट्टीतील सांडपाण्यावर होणार प्रक्रिया; काम प्रगतीपथावर !

दरम्यान, या तुलनेत लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप तर ‘ॲक्शन’ मोडवरच आहे. सोलापूर लोकसभेच्या प्रांतात भाजपच्या विजयाची पताका रोवायची, असा पक्का निर्धार करत या पक्षाने या मतदार संघात काम सुरू ठेवले आहे.

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यासंदर्भात नाराजीचा मुद्दा बाजूला ठेवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात केलेल्या विकास कामांचा, मतदार संघामधील प्रत्येक घटकांसाठी घेतलेल्या चांगल्या निर्णयाचा लेखाजोखा मतदार संघातील मतदारांपर्यंत मांडण्याचे काम या पक्षाकडून केले जात आहे.

तवा तर ठेवायचा तापता, ऐनवेळी परतता येईल भाकरी

भाजपचा बालेकिल्ला झालेल्या सोलापूर लोकसभेत भाजपला या खेपेसदेखील अनुकूल परिस्थिती असल्याचा ठाम विश्‍वास आहे. या पार्श्वभूमीवर, या मतदार संघात उमेदवारीचे फार काही महत्त्व या पक्षातील वरिष्ठांना वाटत नाही, असे सांगितले जाते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांपर्यंत पोचवायचा, निवडणुकीच्या धर्तीवर सर्वच आघाड्यांवर तयारी करायची आणि डाव जिंकायचा असाच भाजपचा ‘होरा’ आहे. तवा तर तापवून ठेवायचा, योग्य वेळ आली की भाकरी परतता येईल, अशीच रणनीती भाजपची सोलापूर लोकसभेबाबत आहे.

एसी प्रवर्गातील सक्षम चेहऱ्याचे अवघडच गणित

आरक्षित मतदारसंघ असलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघात भाजपकडे राखीव प्रवर्गातील तितका सक्षम चेहरा सध्या तरी नाही, जो सुशीलकुमारांसमवेत फाईट टू फाईट लढत देईल. विशेष म्हणजे जो सोलापूर लोकसभा मतदार संघामधील स्थानिक असेल. त्यामुळे सोलापूरच्या उमेदवारीवरून भाजपपुढे पेच आहे. ऐनवेळी माळशिरसचे आमदार राम सातपुते अथवा आणखी नव्या चेहऱ्याचा शोध उमेदवारीसाठी घेतला तर नवल वाटायला नको.

Sushil Kumar Shinde
Mumbai : मुंबईकरांना दिलासा! मेट्रो प्रकल्पामुळे अडवलेले ८४ किमीचे रस्ते वाहतुकीसाठी मोकळे

लक्ष्यवेधी

सुशीलकुमारांचे नाव लोकसभेसाठी निश्‍चित होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंद अन् समाधानाचे वातावरण

सुशीलकुमारांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांना निवडणुकीत ‘ऊर्जा’ मिळणार असल्याची काँग्रेस कमिटीत चर्चा

सोलापूर लोकसभेची निवडणूक लढविताना खासदार डॉ. शिवाचार्य हा फॅक्टर बाजूला ठेवण्याची भाजपची खेळी

लोकसभेसाठी वातावरण अनुकूल करण्याचे भाजप आमदारांना मुंबई आणि दिल्ली भाजप हायकमांडचे फर्मान

सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडवून घेण्याचे निवळले वातावरण

Sushil Kumar Shinde
Mumbai : पावसाळ्यात मध्य रेल्वेचे देशी जुगाड! हार्बर रेल्वे स्थानकांना बांबूच्या मंडपाचा आधार

लोकसभेसाठी प्रणितींचे नाव पडले मागे

सुशीलकुमारांचे वय, लागोपाठचा पराभव, तरुणाईला संधी देण्याची काँग्रेसची भूमिका, शिवाय लोकसभेसाठी प्रणिती शिंदेंचे सर्वच आघाड्यांवरील सक्षम विश्‍व या सगळ्या पार्श्वभूमीवर, सोलापूर लोकसभेसाठी प्रणिती शिंदे यांचे नाव प्रचंड चर्चेत होते. विशेषतः, भाजपची त्यांना ऑफरदेखील होती.

मात्र, राज्याच्या राजकारणात रममाण होण्याची दस्तुरखुद्द प्रणिती शिंदे यांची भूमिका शिवाय या खेपेस सोलापूर लोकसभेसाठी सुशीलकुमार शिंदे यांच्याशिवाय पर्यायच असू शकत नाही, ही काँग्रेसची भूमिका आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेतेमंडळींनी सोलापुरातील मेळाव्यात सुशीलकुमारांच्या लोकसभा लढण्यावर केलेले भाष्य या सगळ्या अनुषंगाने, प्रणिती शिंदे यांचे सोलापूर लोकसभेसाठीचे चर्चेतील नाव आता मागे पडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.