Solapur : गुटक्यासह ४२ लाखाचा ऐवज ताब्यात;मंगळवेढा पोलीसांची कामगिरी

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निपानी (कर्नाटक राज्य) येथुन मालवाहतुक ट्रकमधून सोलापूरला गुटखा जाणार असल्याची खबर पोलीसांना लागताच पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी सांगोला नाका सापळा लावला
crime
crimepolice
Updated on

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - सकाळ वृत्त सेवा कर्नाटकातून आलेल्या विविध कंपन्याच्या ३१ लाख ८०० रु गुटक्यासह ४२ लाख ८ रु ऐवज हस्तगत करण्यात आला याप्रकरणी पोलीसांनी चार जनावर गुन्हा दाखल केला गुटक्यावर पोलीसाकडून वारंवार कारवाई होवून देखील गुटक्याची तस्करी सुरुच आहे

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निपानी (कर्नाटक राज्य) येथुन मालवाहतुक ट्रकमधून सोलापूरला गुटखा जाणार असल्याची खबर पोलीसांना लागताच पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी सांगोला नाका सापळा लावला असता.

मालट्रक क्र एम एच १२ एच.डी. ७८७६ मधुन आज पहाटे ३ वा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या पथकाने नाकाबंदी करून सापळा लावला असता सशंयीत चालकाकडे चौकशी केली.

crime
ST Mumbai : अर्ध्या तिकीटात एसटीचा प्रवास, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;१ महिन्यात तब्बल ४ कोटी, २२ लाख महिलांनी केला प्रवास

राजु चंद्रकांत व्होनमाने वय ५८ वर्षे रा. साधेपुर ता. दक्षिण सोलापुर जि. सोलापुर असे सांगीतले.सदर माल वाहतुक गाडीत पाठीमागील बाजुस ताडपत्री बांधलेली सोडुन बॅटरीचे उजेडात पाहीले असता पाटीमागील बाजुस पांढरे रंगाची पोती दिसत होती. सदर पोत्यात काय आहे याबाबत चालकास विचारणा केली असता त्याने सांगीतले की, सदर पांढरे रंगाचे पोत्यात पानमसाला गुटखा व सुगंधी तंबाखु आहे.

असे सांगीतल्याने आम्ही सदर ट्रक चालकास घेवुन मंगळवेढा पोलीस ठाणेस आणुन ट्रक मधील पोती बाहेर काढुन पाहिले असता त्यामध्ये हिरा पानमसाला पिवळा १२० रु.ची १२३४२ पाकिटे कि १४ लाख ८१ हजार ४० रु,रॉयल ७१७ सुगंधी ३० रु किंमतीची २०४०० पाकिटे कि.६ लाख १२ हजार,हिरा पानमसाला गुलाबी १३० रु किंमतीची ५२०२ पाकिटे कि. ६ लाख ७६ हजार २६० रु,रॉयल ७१७ सुगंधी तंबाखु ६५ रु किंमतीची ५१०० पाकिटे कि.३ लाख ३१ हजार ५०० रु निळा ट्रक नंबर एम एच १२ १ एच.डी. ७८७६ वाहन कि.११ लाख असा ४२ लाख ८०० रु चा ऐवज हस्तगत करण्यात आला.

crime
Mumbai : डोंबिवलीत मंगळवारी वीज पुरवठा सहा तासांसाठी बंद

सदर वाहन चालकाकडे वाहन मालका बाबत चौकशी केली असता वाहन मालक हा सोमनाथ पुजारी रा. मंद्रुप ता. दक्षिण सोलापुर व वाहतुकदार जबीउल्ला सयद उर्फ रोशन यांच्या मार्फत निपाणी, कर्नाटक येथुन करीत असल्याबाबत सांगीतले.वरील वर्णनाचा व किंमतीचा गुटखाजन्य माल व वाहनाचा पंचनामा करून राजु चंद्रकांत व्होनमाने वय ५८ वर्षे रा. साधेपुर ता. दक्षिण सोलापुर ,सोमनाथ पुजारी रा. मंद्रुप ,जबीउल्ला सयद उर्फ रोशन,

रफिक उर्फ रसुल मेनन रा. श्रीरामपुर जि. अहमदनगर यांचे विरूध्द मंगळवेढा पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ येलपले हे करीत आहेत.सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील,

यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक रणजीत माने साो, व सपोनि प्रकाश भुजबळ, प्रशिक्षनार्थी पोसई पुरूषोत्तम धापटे सो. पोहेकॉ दयानंद हेबांडे, पोहकों दत्तात्रय यलपले, पोना सुनिल मोरे, पोकों/वैभव घायाळ पोकॉ/ युवराज वाघमारे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.