Solapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोहोळ तालुक्यासाठी अडीच कोटीचा निधी मंजुर जिल्हाप्रमुख चवरे यांची माहिती

२५१५ ग्राम विकास" या योजनेमधून दोन कोटी ५०लाख रुपयांचा निधी मोहोळ तालुक्याला मिळाल्याने सर्वसामान्य जनतेची सोय झाली आहे.
mohol;
mohol;sakal
Updated on

मोहोळ - बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या पाठ पुराव्यास यश आले असून त्यांच्या प्रयत्नातून ग्रामविकास व पंचायत राज विभागातून सुमारे दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मोहोळ तालुक्यासाठी मंजूर करण्यात आला असल्याची माहीती जिल्हाप्रमुख चवरे यांनी दिली.

या संदर्भात माहिती देताना चवरे म्हणाले पेनूर ता मोहोळ येथील ग्रामपंचायत कार्यालया शेजारी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे सुशोभीकरण करण्यासाठी आठ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्यामुळे पेनूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पेनूर गावातील सुमारे एक कोटी रुपयांचा निधी वाड्या- वस्त्यांवर जाणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील नांदगाव,ढोकबाबुळगाव, रामहिंगणी,भांबेवाडी, वडवळ, सय्यद वरवडे आदी भागातील रस्ते कॉंक्रिटीकरण, रस्ते खडीकरण, भूमिगत गटार, रस्ता मजबुतीकरण यांसारखी विकास कामे केली जाणार आहेत.

mohol;
Mumbai News : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट ; कोणते मंत्री येणार अडचणीत ?

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एक कोटी पन्नास लाख तर जिल्हा परिषदेच्या फंडातून तब्बल एक कोटी असे एकूण अडीच कोटींच्या विकास कामाची मंजुरी शिवसेना नेते चरणराज चवरे यांनी आणली आहे. त्यामुळे स्वातंत्र्य काळापासून रस्ता नसणाऱ्या मोहोळ तालुक्यातील गावकऱ्यांची व शेतकऱ्यांची चांगली सोय होणार आहे.

mohol;
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

"२५१५ ग्राम विकास" या योजनेमधून दोन कोटी ५०लाख रुपयांचा निधी मोहोळ तालुक्याला मिळाल्याने सर्वसामान्य जनतेची सोय झाली आहे. तसेच मोहोळ तालुक्यातील शिवसैनिकांना मोठ्या प्रमाणात ताकद देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा.श्रीकांत शिंदे हे करीत आहेत.येणाऱ्या काळात मोहोळ तालुक्यात सर्वसामान्य जनतेसाठी पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चवरे यांनी सांगीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.