Solapur : चिंचोली MIDC मध्ये शॉर्टसर्किटने आगीचा भडका; १२ कोटींचे साहित्य जळून खाक!

वायरिंग मधून अचानक शॉर्टसर्किट होऊन 'सी बॉक्स' वर ठिणग्या पडून लागलेल्या आगीत एका कंपनीचे विविध साहित्य व कागदपत्रे जळून 12 कोटी 52 हजाराचे नुकसान.
fire
fire esakal
Updated on

मोहोळ - वायरिंग मधून अचानक शॉर्टसर्किट होऊन 'सी बॉक्स' वर ठिणग्या पडून लागलेल्या आगीत एका कंपनीचे विविध साहित्य व कागदपत्रे जळून 12 कोटी 52 हजाराचे नुकसान झाल्याची घटना सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोली औद्योगिक वसाहत येथील डी एन के फूड प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली. या घटनेची नोंद ता 23 रोजी मोहोळ पोलिसात झाली आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, दावल अब्दुल शेख वय-23, रा. लवंगी, ता. मंगळवेढा हे चिंचोली औद्योगिक वसाहत येथील डीएनके फुड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करतात. ता. 21 मे रोजी सकाळी नऊ वाजता शेख हे नेहमीप्रमाणे कामासाठी कंपनीत आले. त्यांच्या बरोबर परचेस ऑफिसर शुभम गायकवाड, समन्वयक मिराज बागवान व इतर कामगार कामावर आले.

fire
UPSC Result 2023 : करमाळ्याच्या शुभांगीने घरीच केला अभ्यास अन् मिळवलं मोठं यश

दुपारी बारा वाजता अचानक अकाउंट विभागात भिंती वरील वायरिंग मधून शॉर्टसर्किट होऊन तडतड असा आवाज येऊन ठिणग्या पडू लागल्या. शेजारीच असलेल्या शी बॉक्सवर ठिणग्या पडल्याने आगीचा भडका उडाला. शेख यांनी तातडीने इतर कामगारांना बोलावून घेऊन घडलेल्या प्रकार सांगून सर्वांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. सर्व कामगारांना बाहेर काढले.

आग विझविण्यासाठी औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक यंत्रणा, तसेच इतर कंपन्यांचे अग्निशामक टँकर व खाजगी पाण्याचे टँकर यांना बोलावून घेतले व आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आग भडकतच गेली. आग कंपनीच्या इतर विभागातही पसरली. या आगीत कंपनीची कागदपत्रे व इतर साहित्य जळून खाक झाले. एकूण 12 कोटी 51 लाख 92 हजार 564 रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची खबर दावल शेख यांनी मोहोळ पोलीसात दिली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.