पोलिस आयुक्‍तांची दोन वर्षे पूर्ण!

पोलिस आयुक्‍तांची दोन वर्षे पूर्ण!
Updated on
Summary

पोलिस आयुक्‍त शिंदे यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ 31 मे रोजी पूर्ण होत आहे.

सोलापूर : शहरातील सर्वसामान्य जनता सुरक्षित राहावी या हेतूने पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे (solapur commissioner of police ankush shinde) यांनी कधी कठोर तर कधी संयमाने निर्णय घेतले. दोन वर्षाच्या काळात त्यांनी शहरातील गुन्हेगारी, मटका, जुगार, अवैध ताडी व्रिकी, अवैध वाळू वाहतूक, अवैध खासगी सावकारकी पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न केला. तसेच कोरोनाची पहिली व दुसरी लाट आटोक्‍यात येण्यात पोलिसांचे मोलाचे योगदान राहिले. (solapur commissioner of police ankush shinde has completed two years of his tenure)

पोलिस आयुक्‍तांची दोन वर्षे पूर्ण!
विद्यापीठाने बनविला कोरोनाला रोखणारा विशेष मास्क !

शहरातील 49 व्यक्‍तींना दोन वर्षात तडीपार करीत पाच गुन्हेगारी टोळ्यांवरही त्यांनी तशी कारवाई केली. दोन वर्षात पोलिस आयुक्‍तांनी तडीपारीचे 32 आदेश काढले. तर 50 प्रस्ताव तयार करण्यात आले असून 80 जणांना तडीपार करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. तत्पूर्वी, गुन्हेगारी वर्तनातून इतरांच्या जीवाला धोका पोचवून त्या परिसरात दहशत पसरविणाऱ्या 13 गुन्हेगारांना येरवाडा कारागृहात पाठविले. 2020 मध्ये आठ तर मे 2021 पर्यंत पाच जणांवर तशी कारवाई त्यांनी केली. वाळू लिलाव नसतानाही शहरातून होणारी अवैध वाळू वाहतूक थांबली. ही कारवाई करताना त्यांनी पोलिस दलातील दोन- तीन कर्मचाऱ्यांनाही घरचा रस्ता दाखविला.

पोलिस आयुक्‍तांची दोन वर्षे पूर्ण!
पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांना अरुण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिस एक्‍सलन्स पुरस्कार

अवैध मटक्‍यावरील कारवाईवेळी त्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याला कायमचे घरी बसविले. गुन्हेगारांशी मैत्रिपूर्ण संबंध ठेवून अवैध व्यवसायाला पाठीशी घालणाऱ्यांची त्यांनी कधीच पाठराखण केली नाही. त्यामुळे शहरातील अवैध व्यवसाय बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, कोरोनाच्या काळात अनेक महापुरूषांची जयंती, पुण्यतिथी रद्द झाली. त्यावेळीही त्यांनी संबंधित संघटना, व्यक्‍तींची समजूत काढून गर्दी होऊ दिली नाही. तर पहिल्या लाटेत प्रतिबंधित क्षेत्र सील करण्याचा त्यांचा पॅटर्न राज्यभर लागू झाला. पोलिस आयुक्‍त शिंदे यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ 31 मे रोजी पूर्ण होत आहे.

पोलिस आयुक्‍तांची दोन वर्षे पूर्ण!
परीक्षेनंतर दोनच दिवसांत निकाल जाहीर! सोलापूर विद्यापीठाची कामगिरी

आयुक्‍तांनी असाही सांगितला अनुभव...

कोरोनाची दुसरी लाट कमी करून शहर सुरक्षित करण्याच्या हेतूने निर्बंध असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले होते. शहरातील बरेच लोक मॉर्निंग वॉकला जात होते. कारवाईनंतर प्रमाण कमी होत गेले. परंतु, जे लोक मॉर्निंग वॉकला यायचे, त्यातील काहीजण सोबत बाजाराची पिशवी घेऊन यायचे. पोलिसांनी त्यांना हटकले तर ते म्हणायचे, आम्ही बाजारासाठी आलोय. त्यांच्या जवळील पिशवीत डोकावले असता, त्यात अवघे दोन- चार कांदे दिसले. त्यामुळे बंदोबस्त वाढवून कारवाईवर भर दिला आणि मॉनिंग वॉकला जाणे बंद झाले, असा एक अनोखा अनुभव आपल्याला आला, असेही पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी सांगितले.

सोलापूरकर खूप संयमी, कुशाग्र, जिद्दी असून उत्सवप्रेमी शहर आहे. त्यांनी दाखविलेल्या संयमामुळेच कोरोनाबाबतीत अनेक तज्ज्ञांनी वर्तविलेले अंदाज खोटे ठरवून दाखविले. सोलापूकरांनी कोरोना काळात निर्बंधाचे पालन करीत शहरात कोरोना वाढू दिला नाही. लोकप्रतिनिधींसह विविध स्तरातील व्यक्‍तींनी पोलिसांना मदत केली.

- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्‍त, सोलापूर शहर

(solapur commissioner of police ankush shinde has completed two years of his tenure)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.