कोरोनामुळे परीक्षेवेळी ऑक्सिजन पातळी 75 इतकी, अशा संघर्षात प्रथमेश राजेशिर्के झाले 'आय ए एस'

सारथी ची शिष्यवृत्ती मिळाली नसती तर अधिकारी झालो नसतो - प्रथमेश राजेशिर्के
IAS Prathmesh Rajeshirke
IAS Prathmesh Rajeshirkesakal
Updated on

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ इतकी क्षमता निसर्गाने प्रत्येकाला दिलेली आहेच. फक्त आत्मविश्वास हवा. अन् एकदा आत्मविश्वासाने सामोरे गेले की, कितीही संकटे आली तरी, यशापासुन कोणीही रोखू शकत नाही. याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे प्रथमेश (अरविंद्र) Arvind राजेशिर्के. एकत्र मोठे कुटुंब, कमविणारे वडिल एकटेच, त्यात घरची परिस्थिती हालाखीचीच, शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन शिक्षण पूर्ण करत. अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असताना, अंतिम परीक्षेच्यावेळी कोरोनामुळे कुटुंबातील 13 जण पॉझिटिव्ह, स्वतः ची ऑक्सीजन पातळी 75 इतकी, अशात कोरोनामुळे वडिलांचे निधन अशा विचीत्र परिस्थितीत मुलाखतीस सामोरे जाऊन, संकटावर मात करत यूपीएससीतुन 'आयएएस' पदाला गवसणी घातली आहे. त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा.

प्रथमेश राजेशिर्के सांगतात की, चिपळून जिल्ह्यातील मांडकी हे खेडेगाव गाव. वडिल माजी सैनिक तर आई गृहिणी. एकत्रित मोठे कुटुंब, वडिलांच्या पेन्शनवरच कुटुंबाच्या संसाराचा गाडा व कुटुंबियातील सर्वांचे शिक्षण सुरू होते. त्यामानाने घरची परिस्थिती अतिशय नाजूक होती. परंतु तरीदेखील ही आई वडीलांनी कधीही या परिस्थितीची जाणीव आम्हा भावंडांना होऊ दिली नाही. लहानपणापासून गुणवत्तेच्या बाबतीत अव्वल असायचो. दहावीपर्यंतचे शिक्षण डेरवण येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पूर्ण केले. दहावीत 95 टक्के हुन अधिक गुण घेणारा गावातील पहिलाच विद्यार्थी त्यामुळे सर्वाच्या आशा आकांक्षा भरपूर होत्या.

स्वतः च्या पायावर उभे रहावे हि आई-वडीलांची आमच्याकडुन अपेक्षा. त्यामुळे कमी कालावधीत चांगले शिक्षण घ्यावे या हेतूने दहावीनंतर शासकीय महाविद्यालयातून डिप्लोमा शिक्षण घेतल्यानंतर सांगली येथील वालचंद महाविद्यालयात इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. तोपर्यंत स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा देण्याबाबत निर्णय नव्हता. परंतु या 'आयएएस, आयपीएस' पदांचे वलय माहिती होते. त्यामुळे पदवीचे शिक्षण घेतानाच स्पर्धा परीक्षेविषयीची माहिती घेण्यास सुरवात केली.

त्यात पदवी शिक्षण पुर्ण होताच कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून पुणे येथे नोकरी मिळाली. घरच्या परिस्थितीमुळे नोकरीला प्राधान्य दिले. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही सुरू ठेवला. जवळपास एक वर्षभर पुण्यात नोकरी केली; मात्र अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने, कुटुंबियांची परवानगी घेऊन, नोकरी सोडली. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे पुण्यातील खर्च पेलावत नसल्याने, चिपळुण मध्ये खोली भाड्याने घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.

युपीएससीची तयारी करत असताना एक दोन वेळा एमपीएससीच्या देखील परिक्षा दिल्या त्यात पहिल्या प्रयत्नात पुर्व परिक्षेत यश मिळाले परंतु नंतर अपयश येत होते. अभ्यास युपीएससीचा व परिक्षा एमपीएससीच्या असं होतं असल्याने, पुर्णवेळ युपीएससी करण्याचा निर्धार केला. थोडे दिवस तिथे अभ्यास करून नंतर दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. आर्थिक बाजू कुमकुवत असल्याने, काटकसर करत तिथे फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. याकाळात राज्य सरकारच्या 'सारथी' ची परीक्षा दिली. त्यामध्ये चांगले गुण मिळाले. त्यामुळे 13 हजाराची प्रतिमहिना शिष्यवृत्ती मिळाली.

यातूनच दिल्ली येथे परीक्षेचा अभ्यास सुरू होता. यापूर्वी दिलेल्या युपीएससीच्या परिक्षेत चार गुणांनी अपयशास सामोरे जावे लागले होते. याकाळात वडिलांनी पुन्हा नव्या उमेदीने परिक्षेला सामोरे जाण्यासाठी पाठबळ दिले. पुन्हा जोमाने प्रयत्न सुरू केले. युपीएससीच्या पुर्व परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. मुख्य परीक्षेच्या कालावधीत कोरोनाच्या संकटामुळे दिल्लीहुन गाव गाठले. अभ्यासाची लागलेली सवय विस्कळीत झाली. त्यामुळे वडिलांनी घराशेजारी असलेली एक खोली अभ्यासासाठी उपलब्ध करून दिली.

(मुख्य परीक्षेस ) interviewla दोन महिन्यांचा कालावधी बाकी असताना. माझ्यासह कुटुंबातील एक - एक करत 13 जणांना कोरोनाची लागण झाली. ऑक्सीजन पातळी 75 इतकी होती. 'जगतो की मरतो' अशी स्थिती होती. मानसिक खच्चीकरण झाले. एकिकडे आर्थिक परिस्थिती तर दुसरीकडे अभ्यासासाठी होणारा खर्च व त्यात कोरोनामुळे संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह असल्याने, अशा परिस्थितीत खऱ्या अर्थाने 'सारथी' पाठीशी उभी राहिली.

मुख्य परीक्षेच्या खर्चासाठी सारथी कडे अर्ज केला होता तो याकाळातच मंजूर झाला व थेट माझ्या बँकेच्या खात्यावर 50 हजार रुपये जमा झाले‌. त्यामुळे अभ्यासासाठी एक प्रेरणा मिळाली. कोरोनाच्या त्या वार्डमध्ये दिवसभर बेडवर पडुन मोबाईलवर पीडीएफ फाईल मध्ये वाचन सुरूच होते. कोरोनातुन मी कसाबसा बाहेर पडलो. परंतु या कोरोनाने वडिलांना मात्र हिरावून नेले. घरातील कर्ते व सर्वस्व असणारे वडिलांच्या जाण्याने खच्चीकरण झाले. मानसिक कुचंबणा होऊ लागली. अभ्यासावर विपरीत परिणाम झाला.

अशा परिस्थितीत देखील मुख्य परीक्षेसाठी दिल्ली गाठली. 'सारथी' ने दिलेल्या पैश्यातुन झेरॉक्स मशीन घेऊन टेस्ट सिरीज सोडवल्या. व घरच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने, मन एकाग्र व शांत ठेवत, जिद्दीने मुख्य परीक्षा व मुलाखत दिली. व अखेर 2021 च्या युपीएससीच्या निकालात 'आय ए एस' पदी निवड झाली. अथक परिश्रम, व अनेक संकटांवर मात करत मिळवलेले हे यश पाहण्यासाठी आज वडिल नसल्याचे दुःख आजही होते. सध्या मसुरी येथे प्रशिक्षण सुरू आहे. या पदापर्यंत पोहचेपर्यंत कुटुंबियांचा पाठींबा व 'सारथी' ची साथ लाभ त्यामुळे हे यश संपादन करता आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.