Latest Barshi News: तुळजापूर रस्त्यावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्याची जालन्याच्या दोन व्यापाऱ्यांनी खरेदी करून निम्म्यापेक्षा अधिक रक्कम दिली. पण उर्वरित २१ लाख १३ हजार ५५५ रुपयांची वारंवार मागणी केली तरी दिले नाहीत. या प्रकरणी दोघांविरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
अतिन अशोक पांगारकर (रा. जालना रोड, बीड), संतोष अण्णा नवपुते (रा. जालना), अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. नितीन शेटे (रा. दत्तनगर) यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना २२ सप्टेंबर २०२३ ते २७ डिसेंबर २०२३ दरम्यान घडली.